सोलापूर – अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी खा.प्रणिती शिंदे यांच्या वतीने अक्कलकोट तालुक्यातील हिळी आणि बबलाद या गावांमध्ये अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले. ऐन दिवाळी सणाच्या अगोदर ही नैसर्गिक आपत्ती ओढवल्याने पूरग्रस्त कुटुंबांना या कठीण काळात दिलासा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
दरम्यान, गावकऱ्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सातलिंग शटगार, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, पद्मिनी शेट्टीयार, शिल्पा चांदणे, कामना बरगाले, सिद्धू डोळे, व्यंकटेश बाके, हनुमंतराव पाटील, सचिन याबाजी, अमोघसिद्ध पुजारी आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
अक्कलकोट तालुक्यातील हिळी व बबलादमध्ये पूरग्रस्तांना अन्नधान्य कीटचे वितरण करताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार