अक्कलकोट – १४ नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय बाल दिनाचे औचित्य साधून शिक्षणापासून व शाळेपासून वंचित असलेल्या झोपडपट्टी परिसरातीललहान मुलांना क्रीम बिस्किट, केक,डेरी मिल्क चॉकलेट अशा गोड-धोड पदार्थ वाटून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला.
या खाऊ वाटप उपक्रमाला मोहसीन मोकाशी, अब्दुल हनान अत्तार,रशीद खिस्तके,अकीब बागवान,मुबिन अन्सारी सर, सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांचे मोलाचे सहकार्य लाभले.झोपडपट्टी परिसरातील २५ ते ३० लहान मुलांना व महिलाना खाऊ वाटप करण्यात आले.
या वेळी सोहेल फरास,मोहसीन मोकाशी, अब्दुल हनान अत्तार,रशीद खिस्तके, अकीब बागवान,मुबिन अन्सारी सर, अशरफ गोलंदाज,अल्ताफ बागवान आदी उपस्थित होते.


















