अक्कलकोट – कुरनूर: पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे यांच्या पुढाकारातून आनंद मेडिकल फाउंडेशन संचलित आनंद इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यातर्फे अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावेळी पंचायत समितीचे माजी विरोधी पक्ष नेते बाळासाहेब मोरे,आनंद इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका.सरला रेवगडे यांच्यासह शिक्षक व पालक उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील कुरुळी, तालुका खेड पुणे येथील आनंद मेडिकल फाउंडेशनच्या स्कूलने कुरनूर येथे येऊन पूरग्रस्तांच्या घरांची पाहणी करून त्यांना संसार उपयोगी वस्तूंचे किट वाटप करण्यात आले यामध्ये गहू,बाजरी, ज्वारी, साखर, यासह जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. यासाठी संस्थेचे संस्थापक डॉ . अनिल काळे यांनी अनमोल मदत केली.तत्पूर्वी मुख्याध्यापिका रेवगडे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की शाळा ही समाजाचे प्रतिबिंब असते म्हणून समाजाचे ऋण व्यक्त करण्याची वेळ आली तर शाळा सदैव तत्पर असते.पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे आम्ही फुल ना फुलाची पाकळी म्हणून तुम्हाला मदत करत आहोत यापुढे देखील आमची संस्था नेहमीच मदतीसाठी तत्पर असेल असे म्हणाले प्रास्ताविक बाळासाहेब मोरे यांनी केले आनंद इंग्लिश स्कूलच्या कार्याचे कौतुक केले . यावेळी सर्व ग्रामस्थ पुरग्रस्त बाधित नागरिक उपस्थित होते शाळेच्या पालक संघटनेचे संतोष कानूरकर, रवी गवारे, शिरीष कड, मनोज बागडे, संतोष येळवंडे, दिनेश कड, निलेश कड, श्रीशैल्य बबलाद, सत्यवान वाडेकर हे पालक सभासद समवेत आदित्य वाजे, रेश्मा लांडगे, दिपाली फरांदे शिक्षक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिन पवार यांनी केले.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...


















