माढा – क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त महात्मा फुले प्रतिष्ठान माढा च्या वतीने आयोजित विविध स्पर्धाचे पारितोषिक वितरण आणि विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्तींचा “”महात्मा फुले गौरव पुरस्कार”” प्रदान सोहळा आज रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ गोरे यांच्या शुभहस्ते व सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपकजी वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजिनाथ आप्पा माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शनिवार दिनांक 11 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महात्मा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास माढा तालुक्याचे माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या हस्ते माजी उपसरपंच राजेंद्र चौरे नगराध्यक्ष मीनलताई साठे माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार नाना भांगे आदींसह प्रमुख पदाधिकारी सामाजिक राजकीय संघटनेचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलताना श्री माळी यांनी सांगितले की राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित नेत्र शिबिरामध्ये 121 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 45 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे .यासाठी शंकर शेठ साबळे रुग्णालय सोलापूर यांच्या वैद्यकीय टीमने सहकार्य केल्याचे सांगितले.
रविवारी सायंकाळी सात वाजता शैक्षणिक सामाजिक औद्योगिक शेती पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना महात्मा फुले गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी नामदार जयकुमार भाऊ गोरे यांच्यासह अध्यक्ष दीपक वैद्य महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अॅड अमृता वाघे, माढाच्या नगराध्यक्षा मिनलताई साठे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह शिंदे, पंचायत समितीचे सभापती पंडित काका देशमुख ,जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज भैय्या सावंत, युवा नेते दादासाहेब साठे ,जिल्हा परिषद सदस्य माधुरी मोरे ,वंदना शिवाजी कांबळे, भाजपा अध्यक्ष योगेश पाटील, तहसीलदार संजय भोसले ,सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे, श्री कुंभार साहेब, गटविकास अधिकारी महेश सुळे, गटशिक्षण अधिकारी विकास यादव यांचेसह शहर आणि परिसरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यानंतर सुप्रसिद्ध अशा प्रा वसंत हंकारे यांचे ” न समजलेले आईबाप..” या विषयावर व्याख्यान संपन्न होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ हनुमंत क्षिरसागर, सचिव लक्ष्मण राऊत, जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष संतोष राऊत आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे
चौकट…. यांचा होणार सन्मान
आदर्श शिक्षक:-
पांडुरंग विठ्ठल शिंदे, प्रताप बजरंग शहाणे
आदर्श समाजसेवक:- डॉ विकास मस्के
आदर्श पत्रकार:-
धैर्यशील महेश भांगे
आदर्श माता:-
श्रीमती सुनिता तानाजी माळी आदर्श उद्योजक:-
जमीर महंमदहुसैन तांबोळी हारून नजीर मुलानी
आदर्श शेतकरी :-
सार्थक विकास साठे
























