सोलापूर – यांद्याच्या वर्षी सुद्धा होटगी मठाचे वीरतपस्वी शाळेचे शोभायात्रा मल्लिकार्जुन मंदिर पासून अक्कलकोट रोड विरतपस्वी शाळेपार्यंत होता.शोभायात्रेत शंकर,पार्वती, गणेशचे सजीव देखावा उठून दिसत होता.त्याच बरोबर शोभायात्रेत महादेवाचे उत्सवमूर्ती रथात ठेवलेला होता.त्यांचा सर्व भक्तांना दर्शनाचा लाभ मिळत होता.
मिरवणुकीत जवळजवळ शिक्षक विद्यार्थी मिळून दीड हजारांची संख्या होती.शोभायात्रेत विद्यार्थी लेझीम,नटराजाची वेशभूषा परिधान करून नृत्य करीत होते.सदर शोभायात्रा विणकर बाग येथे आल्यानंतर हरि ओम विणकर बाग बहुद्देशीय संस्थेकडून शोभायात्रा मध्ये सहभागी झालेले विद्यार्थी व शिक्षकांना प्रसाद वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बालाजी जंगम, लक्ष्मीकांत दंडी, विनायक सिद्धम,हिरालाल धुळम,अशोक यज्जा,संजीव नादरगी, ईरना चंशेट्टी,श्रीधर अंबाल त्याच प्रमाणे वीरतपस्वी संस्थेचे सचिव स्वामी सर,संचालक शशिकांत रामपुरे उपस्थित होते.


























