प्रबोधनकार ठाकरे हायस्कूल शहागड येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना रजिस्टर वह्या व पुस्तकाचे वाटप
तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
अबंड दि २७ जुलै/ शनिवार (शहागड): प्रबोधनकार ठाकरे हायस्कूल येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेकडून शाळेतील पहिली ते सातवी पर्यंतच्या दोनशे विद्यार्थ्यांना रजिस्टर वह्या वापट वापट करण्यात आल्या. यावेळी युवासेना तालुका युवाधिकारी गणेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मुख्य आयोजक युवासेना विभागीय सचिव विनायक चोथे, शाळेचे मुख्याध्यापक महेश गोडबोले,शिवसेना विभागप्रमुख राजेश राऊत,सरिफ तांबोळी, शाखाप्रमुख शिवाजी ढवळे, लक्ष्मण धोत्रे, दानिश कुरेशी, योगेश उंबरे, कृष्ण मापारी, सिद्धांत जाधव, शरद पेटारे, संतोष देशमुख, आप्पासाहेब पवार तसेच
शिक्षकसेनेचे सोनवणे सर, इंगळे सर,वाव्हूळ सर, बनसोडे सर आणि शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.