सांगोला – हिंदुस्थान फीड्सच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यु.कॉलेज येथे सॅनिटरी पॅड्सचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी मार्केटिंग ऑफिसर निलेश इंगळे, सेल्स ऑफिसर वैभव मलमे, नगरसेवक माऊली तेली, उद्योगपती नागेश तेली, प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापक चारूदत्त जगताप, पर्यवेक्षक काकासो नरूटे, कंपनीचे डीलर अन्वर बागवान, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हंबीरराव माने यांची नात देवयानी माने यांनी हा प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा शैक्षणिक व सामाजिक उपक्रम पूर्णत्वास येत आहे.
या उपक्रमांतर्गत सांगोला तालुक्यातील शाळांना ३० हजार सॅनिटरी पॅड्स आणि ७० हजार वह्यांचे वाटप केले जाणार आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेजा झपके, सूत्रसंचालन संध्या तेली यांनी केले. आभार मनीषा पांडे यांनी मानले.


























