कै .सितादेवी तकीक सामाजिक संस्थेकडून शालेय साहित्य वाटप .
तभा वृत्तसेवा येरमाळा – तेरखेडा येथील कै . सितादेवी बाबुशा तकीक सामाजिक बहुद्देशीय संस्था यांच्या वतीने दि .२२ रोजी विद्यार्थ्यांना स्कुल बॅग व शालेय साहित्य वाटप करण्यात आले . सालाबादाप्रमाणे या वर्षीही संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त तेरखेडा येथील गणेश विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, कंपास पेटी, वह्या अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप संस्थेचे अध्यक्ष लहु तकीक, सदस्य सचीन पाटील, निरजकुमार त्रिपाठी, सुभाष पौळ, कोषाध्यक्ष सरिता तकीक, सचिव शोभा तकीक यांच्या हस्ते करण्यात आले .
त्याच बरोबर शिक्षक ढोले एस एस यांच्याकडून ही विद्यार्थ्यांना कंपासपेटी चे वाटप करण्यात आले . या कार्यक्रमप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक बोंदर ए सी, कोकाटे सर, ढोले सर, अवधुत सर, पाटील मॅडम, तांदळे मॅडम, गणेश आवटे हे उपस्थित होते .कै सितादेवी तकीक या संस्थेने आजपर्यंत अनेक समाजपयोगी कार्यक्रम राबविले आहेत . सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान मेळावे यांसारख्या विविध प्रकारच्या स्पर्धात्मक कार्यक्रमातुन विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली जातात . या उपक्रमाबद्दल तेरखेडा परिसरात या संस्थेचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे .