अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्तजयंती निमित्त गुरुवारी सकाळी विविध धार्मिक कार्यक्रमानंतर शेकडो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, न्यासाकडून सुरु असलेल्या समर्थ महाप्रसाद सेवेला ४ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून २६५ लाभार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले. गेली ४ वर्षे “ समर्थ महाप्रसाद सेवा” हा उपक्रम स्वामीकृपेने अविरतपणे सुरु आहे.
दरम्यान स्वामी भक्त देणगीदार यांच्या हस्ते महानैवेद्य, आरती संपन्न झाल्यानंतर महानैवेद्याचा संकल्प सोडण्यात आला. यासह न्यासाने सुरु केलेल्या समर्थ महाप्रसाद सेवेला श्रीदत्त जयंतीच्या या दिवशी ४ वर्ष पूर्ण झाले असून, दररोज २६५ निराधार, दिव्यांगांना दोन वेळचा ‘समर्थ महाप्रसाद’ डबा घरपोच दिला जातो. यंदा सदरच्या लाभार्थ्यांना थंडीचे वाढते प्रमाण पाहता सर्वाना स्वेटरचे वाटप सिने अभिनेते अक्षय मुदवाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मनोजकुमार लोहिया हे उपस्थित होते.
**राज्याच्या धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य :*
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचा विविध क्षेत्रातील अफाट कार्य व परिसरातील विकासाने श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात भर पडत असून, धार्मिकते बरोबरच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्रीडा या क्षेत्रात राज्याच्या धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. उत्तोरोत्तर अन्नछत्र मंडळाची प्रगती होतच राहील अशा शुभेच्छा माज्याकडून देत आहे.
सिने अभिनेते अक्षय मुदवाडकर श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारणारे
**समर्थ महाप्रसाद लाभार्थ्यांना स्वेटर वाटप :*
गेल्या वर्षभरापासून न्यासाकडून दररोज २६५ निराधार, दिव्यांगांना दोन वेळचा समर्थ महाप्रसाद डबा घरपोच दिला जातो. अशांनकरिता गुरुवारी श्रीदत्त जयंती निमित लाभार्थ्यांना महाप्रसादा बरोबरच स्वेटर वाटप करण्यात आले. सदर लाभार्थ्यांना शहरातील विविध ठिकाणाहून वाहनांच्या माध्यमातून अन्नछत्र मंडळात आणण्यात आले.
अविरत सेवा :
अक्कलकोट शहरातील गरजू, वृद्ध, दिव्यांग, निराधार लोक आम्ही या अगोदर उपाशी राहून दिवस काढलो आहोत, ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता सेवेकाऱ्यानी सण, वार, उत्सवाच्या काळातही “समर्थ महाप्रसाद” सेवा ही अविरत गेल्या ४ वर्षापासून सुरु आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले हेच आमचे आधारवड असून, या सेवेबरोबरच आपुलकीचे नाते, काळजी आमची घेत असल्याचे लाभार्थी रत्नाबाई बनसोडे, शरीफ मुल्ला, पार्वती ऐवळे, ललिता होटकर यांनी याप्रसंगी सांगितले.
*समर्थ महाप्रसाद सेवा :*
“समर्थ महाप्रसाद” सेवेने गेल्या ४ वर्षात मोठा टप्पा पार केला असून २६५ जणांना सकाळी व संध्याकाळी पुरेल असा घरपोच डबा देण्यात येत आहे. बाहेरून आलेल्यांची अन्नछत्रच्या माध्यमातून सेवा केली जाते. परंतु श्री क्षेत्र अक्कलकोटातील निराधार, दिव्यांगांना आधार मिळावा म्हणून ही सेवा सन २०२१ च्या दत्त जयंती पासुन सुरु असल्याचे न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी सांगितले.
यावेळी श्री शितोळे बाबा ट्रस्ट घाटकोपर (पूर्व), मुंबई येथून आलेल्या पालखीचे स्वागत अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी केले.
या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक दिपक भिताडे उत्तर पोलीस ठाणे, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, रामचंद्रराव घाटगे, मनोज निकम, अप्पा हंचाटे, सनी सोनटक्के, मुख्य लेखापरीक्षक ओंकारेश्वर उटगे, डॉ. प्रसाद प्रधान, सौरभ मोरे, सिद्धेश्वर मोरे, रोहित खोबरे, बाबू मसुती, निखील पाटील, प्रवीण घाडगे, प्रदीप सलबत्ते, प्रवीण बाबर, विजय माने, ज्ञानेश्वर भोसले, राहुल इंडे, मल्लिकार्जुन बिराजदार, प्रसाद मोरे, सुमित घाडगे, छोटू फडतरे, आकाश गडकरी, रोहन नंदने, काशिनाथ चिंचोळकर, नाथाभाऊ भजनावळे, मयुरेश माणकेश्वर, भिमाशंकर गवळी, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, सोमकांत कुलकर्णी, विश्वंभर पुजारी, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, सतिश महिंद्रकर, नामा भोसले, शहाजीबापू यादव, बाळासाहेब घाडगे, गोरख माळी, रामचंद्र समाणे, योगेश कटारे, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, धनंजय निंबाळकर, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, रमेश हेगडे, राजू पवार, गोविंदराव शिंदे, महादेव अनगले, मल्लप्पा कोगनुरे, शावरेप्पा माणकोजी, प्रतिक लांडगे, चंद्रकांत कुंभार, सागर जाधव, विपुल कदम, रोहित कदम, किरण साठे, साहिल सय्यद, समर्थ शिंदे, काशिनाथ वाले, व निर्धारित वेळेत लाभार्थ्यांना डबा पोहच करणारे सेवेकरी अतिश पवार, मारुती बोरकर, अप्पाशा मलवे, शेखर कांबळे, संतोष मोरे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.


























