उमरी (प्रतिनिधी ) उमरी तालुक्यातील ग्रामपंचायत रोजगार सेवकांना दिनांक २७ जून रोजी उमरी पंचायत समितीच्या वतीने उमरी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सॅमसंग गॅलेक्सी कंपनीचे टॅब तहसीलदार प्रशांत थोरात व गटविकास अधिकारी व्ही.आर.आरवटवाड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे .
उमरी तालुक्यात ५८
ग्रामपंचायत आहेत त्या अंतर्गत स्तरावर रोजगार सेवकांना टॅब आता त्यांना युजर ॲन्ड पासवर्डमुळे रोजगार सेवकांचा वेळ व तालुका स्तरावर येणे जाणे गैरसोयीचे होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या मनरेगा विभागाकडून टॅब देण्यात आले टॅबच्या साह्याने एका ॲप्लीकेशनद्वारा कामावरील मजुरांची छायाचित्रात घेऊन मजुरांची ऑनलाईन हजेरी घेण्याची सोयीस्कर होणार आहे यामुळे बोगस मजुराची हजेरी घेण्यास आळा बसू शकणार आहे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत उमरी पंचायत समितीच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमाचे अध्यक्ष गट विकास अधिकारी व्ही आर अरबडवाड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उमरी तहसीलचे तहसीलदार प्रशांत थोरात हे होते
उमरी तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतच्या ग्राम रोजगार सेवकांना टॅब कसा हँडल करायचा याबद्दल ए.पी.ओ. शुभम कांबळे यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन करून ग्राम रोजगारांना ह्या टॅब चे महत्व पटवून दिले
तर ह्या कार्यक्रमास सहकारी म्हणून वरिष्ठ लिपिक मिलिंद पारडे तांत्रिक अधिकारी आर.जे. गोणेकर तांत्रिक अधिकारी आनंदा पारदे जेई चव्हाण पीटीओ.संगणक चालक शिंदे व पोटेवाड सी डी पी ओ हे होते तर या कार्यक्रमास ग्राम रोजगार सेवक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपिक मिलिंद पारडे यांनी मानले.