कामाजी शिंदे
उमरी ( प्रतिनिधी ) आज ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात समूह शहरी भागामध्ये दाखल होत आहे प्रत्येकाला जिल्हा परिषदेमधून शिक्षण नकोय शहरी भागाचे आकर्षण पाहून सर्व पालक व विद्यार्थी मोहित होत आहेत परंतु येणाऱ्या काळामध्ये तेच त्यांच्या पायावर दगड टाकून घेत आहेत कारण प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये उत्तम प्रकारे शिक्षण मिळत असताना
शहरी भाग आकर्षणाचे केंद्रबिंदू बनलेला आहे त्यामध्ये जे ऍक्टिव्हिटीज पाहण्यात एवढ्या मिळत नाहीत इंग्रजी शाळांच्या जे वरवरच्या कृती आहेत त्या कृतीमुळे पालक वर्ग व पाल्य वर्ग हा अतिशय मोहात येऊन पडलेला आहे आज प्रत्येकाला वाटत आहे गावातील जिल्हा परिषद शाळा नको प्रत्येकजण शहरी भागात येऊन रूम करून स्वतः खर्च करून या शाळांमध्ये दाखल होत आहेत
परंतु 100 विद्यार्थ्यांमध्ये बसून कितपत ज्ञान अवगत होईल याचा विचार पालकांनी केला पाहिजे याच जिल्हा परिषद शाळेने अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत आज जिल्हा परिषद शाळेमधून संस्कृती व संस्काराचे धडे शिकवले जातात याच जिल्हा परिषद शाळेमध्ये टीईटी पास होऊन आलेले दर्जेदार शिक्षक असतात परंतु या सगळ्या गोष्टी सोडून पालक वर्ग आपल्या मुलाला फक्त आकर्षणासाठी इंग्रजी शाळांमध्ये आणि शहरातील शाळांमध्ये दाखल करत आहे
जिल्हा परिषद शाळेमध्ये मोजक्या विद्यार्थ्यांमध्ये शिकवण्याची शिक्षकांची क्षमता अधिकचे असते म्हणजे आज तुम्ही शहरी भागामध्ये एका वर्गामध्ये 100 विद्यार्थ्यात काय अध्ययन करणार आहात व अध्यापन करणारा यामुळे पालक वर्गाने जो समोर येणारा धोका आहे तो टाळला पाहिजे जिल्हा परिषद शाळेमधूनच अनेक नेते विचारवंत घडले फक्त एक बाहेरील आकर्षण म्हणून आज ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थी शहरी भागाकडे वळत आहे त्यामुळे मराठी शाळा ओस पडण्याच्या मार्गावर आहेत
मराठी मायबोली या मायबोलीला विसरून चालणार नाही याच मराठीने अनेक महापुरुषाला निर्माण केलेले आहे त्यामुळे जे आकर्षणाचे केंद्र बनलेले इंग्रजी स्कूल हे काही काळापुरते आहे. अस प्रतिक्रिया शिंदे कामाजी पोलीस बॉईज असोसिएशन मराठवाडा अध्यक्ष यांनी दिली आहे