हदगाव तालुका प्रतिनिधी :-
हदगाव शहरातील वार्ड क्रमांक .१६ मधील अंगणवाडीच्या एकूण ३० विद्यार्थ्यांना १५ ऑगस्ट २०२४ स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सामाजिक कार्यकर्ते संदीप सोनुले यांनी समाजाचे काही देणे लागते या उद्धात हेतूने प्रेरित होऊन या विद्यार्थ्यांना गणवेश स्वखर्चातून वाटप केले. १५ ऑगस्ट व २६ जानेवारी रोजी निघणाऱ्या प्रभात फेरीसाठी लहान मुलांमध्ये नेहमीच मोठ्या प्रमाणात उत्साह व आकर्षण असते. देश भावना लहान वयातच रुजविण्यासाठी प्रत्येक शिक्षक व पालक हे विद्यार्थी वर बाल अवस्थेच्या वेळेसच त्यांच्या मनात देशाविषयी प्रेम खोलवर रुजवण्याचे प्रयत्न करत असतात.
नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या संदीप सोनुले यांनी हीच बाब हेरून हदगावतील संबंधित अंगणवाडीच्या ३० विद्यार्थ्यांना स्वखर्चातून गणवेश वाटप केले तसेच यावेळी अंगणवाडी साठी स्वतंत्र शेड साठी लागणाऱ्या निधीची मागणी विद्यमान आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडे करणार असल्याची ग्वाही संबंधित वार्डातील नागरिकांना दिले त्यांच्या या स्तुतीपूर्ण उपक्रमाबद्दल शहरासह संबंधित शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पालकातून त्यांचे कौतुक होत आहे. सदरील गणवेश वितरणाच्या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक भिसे, सामाजिक कार्यकर्ता पौर्णिमा सावते, दीक्षा जमदाडे व विद्यार्थ्यांचे पालक यावेळेस उपस्थित होते.