तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या खुना मागील सूत्रधार अद्याप मोकाट आहेत त्यांचा शासनाने शोध घेतला पाहिजे अशा आशयाचे निवेदन आज डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात आले
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, विवेकवादाचा प्रसार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजविण्यासाठी आयुष्य वेचले. समाजाला विचार करण्याची ताकद, प्रश्न विचारण्याचं धैर्य आणि तर्कशुद्धतेचा मार्ग दाखविला
जादूटोणा विरोधी कायदा होण्यासाठी डॉ. दाभोलकर यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. अतिशय ओघवत्या भाषेत त्यांनी आयुष्यभर अंधश्रद्धेच्या विरोधात समाजाचे प्रबोधन केले. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला आज 12 वर्षे पूर्ण झाली. तरीही त्यांच्या खऱ्या मारेकऱ्यांने आजही पोलिस आणि सरकारने पकडलेले नाही. त्यांचा शोध घेतला पाहिजे असे निवेदनात म्हंटले आहे
निवेदन दिल्यानंतर बोलताना राज्य कार्यकारिणीच्या सदस्य उषा शहा म्हणाल्या की आम्ही सारे दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश आहोत हे ठणकावून सांगूया… त्यांनी रुजवलेली विवेकाची बीजे, अंधश्रद्धेविरोधातली लढाई आणि विज्ञानाधारित विचारांची परंपरा पुढे घेऊन जाऊया तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
Post Views: 9