अक्कलकोट – रोटरी क्लब अक्कलकोट येथे डिस्ट्रिक्ट प्रांतपाल रो. . सुधीर लातुरे यांनी सदिच्छा भेट देत क्लबच्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला.
यावेळी फर्स्ट लेडी रो. संगीता लातुरे, डी.जी. सेक्रेटरी रो. तापडिया ; असिस्टंट गव्हर्नर रो. . सचिन चौधरी उपस्थित होते.
प्रारंभी अध्यक्ष रो. गुरुशांतप्पा पाटील, सचिव रो. प्रदीप तोरस्कर, कोषाध्यक्ष रो. केदार नरोणे व सर्व रोटेरियन सदस्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सह विचार सभा झाली . डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांनी क्लबतर्फे राबविण्यात आलेल्या विविध सेवा व सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती जाणून घेतली. क्लबचे अहवाल तपासून कामकाजाचा आढावा घेत बोर्ड ऑफ डायरेक्टर सदस्यांशी संवाद साधला.
सार्वजनिक सभेला राष्ट्रगीताने सुरुवात झाली. अध्यक्षांनी प्रस्ताविक करत क्लबच्या सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी कार्याची माहिती उपस्थितांसमोर मांडली.
नेशन बिल्डर अवॉर्ड . हरदास व देसाई यांना, तर व्होकेशनल अवॉर्ड . रायप्पा बिराजदार व अब्दुलरजाक पठाण यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . . पुरस्कारार्थ्यांच्या कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले.
या कार्यक्रमामध्ये अक्कलकोट रोटरी क्लब पुरस्कृत मालिकार्जुन इट्रॅक्ट क्लब किणी,याची नवीन मंजुरी रोटरी इंटरनॅशनल कडून मिळालेली आहे त्याचे रोटरी इंटरनॅशनल चार्टर क्लब मेंटर रो..तुळजापूरे यांना डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुधीर लातुरे यांच्या हस्ते मंजुरी पत्र प्रदान करण्यात आले,
मार्गदर्शनपर भाषणात रो. . सुधीर लातुरे यांनी रोटरीच्या सेवा कार्याची उद्दिष्टे, समाजातील योगदान आणि सदस्यांची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. .. अक्कलकोट येथे राबविण्यात येणाऱ्या ग्लोबल ग्रँट प्रकल्पाबाबत माहिती देत भविष्यात अधिक प्रभावी सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. नितीन पाटील यांनी केले . आभार प्रदर्शन रो. . प्रदीप तोरस्कर यांनी मानले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

























