करकंब : पोलीस रायझिंग डे निमित्त पोलीस मुख्यालय सोलापूर यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत ३०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.या निबंध स्पर्धेमध्ये चेतना विकास मंडळ संचलित न्यू.इंग्लिश स्कूल करकंब या प्रशालेतील इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी आसावरी दीपक शेटे व इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी वैभवी सतीश खरात या विद्यार्थिनींनी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.
यामध्ये इयत्ता चौथी ते आठवी या गटांमध्ये आसावरी दीपक शेटे हिच्या एआय तंत्रज्ञान फायदे,तोटे या विषयावरील निबंधास जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळाला.इयत्ता नववी ते बारावी या गटांमध्ये इयत्ता दहावीची विद्यार्थिनी वैभवी सतीश खरात हिच्या मोबाईलचे फायदे,तोटे या विषयावरील निबंधास जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळाला.या यशस्वी विद्यार्थिनींचा जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांच्या शुभहस्ते पोलीस मुख्यालय सोलापूर येथे मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमप्रसंगी करकंब पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर उपस्थित होते.
या यशस्वी स्पर्धकांचे संस्थाध्यक्ष संजीव कुमार म्हेत्रे सर,सचिव अविनाश देवकते सर,मुख्याध्यापक श्रीकांत लऊळकर,शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


















