श्रीपूर – माळशिरस येथिल व सध्या चैतन्य विद्यालय व सुधाकर दंडवते कनिष्ठ महाविद्यालयाय नीरा नमसिंहपूर ता . इंदापूर या संस्थेत कार्यरत असलेले कनिष्ठ लिपीक नंदकुमार बापूराव पाटील यांना जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघटना पुणे यांच्यावतीने थोर समाज सुधारक महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हास्तरीय आदर्श व गुणवंत लिपीक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले .
सदर पुरस्कार पत्नी सुरेखा पाटील, मुले सोहम पाटील व माऊली पाटील यांच्या समवेत कार्यक्रमाचे अध्यक्ष उल्हासदादा पवार, माजी आमदार ज्येष्ठ, साहित्यिक व थोर विचारवंत यांचे शुभहस्ते स्वीकारला . यावेळी व्यासपिठावर सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता विजय खरे तसेच महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने, शिवाजीराव खांडेकर य उपस्थितीत होते .
सदर पुरस्कार सोहळा राष्ट्रसेवा दल निळू फुले सभागृह,साने गुरुजी स्मारक, पर्वती पायथा, सिंहगड रोड,पुणे येथे पार पडला . शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन नंदकुमार पाटील यांना सन्मानित करण्यात आले . त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष विनोद गोरे, संघटनेचे कार्याध्यक्ष प्रसन्न कोतुळकर, माजी अध्यक्ष संजय धुमाळ व संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पाटील यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे चैतन्य विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी व सभासद यांनी अभिनंदन केले. व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


















