सोलापूर – सालाबादप्रमाणे नवीन वर्षाच्या अनुषंगाने तसेच शंकरदादा वाघमारे संगीत विशारद यांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय उत्कृष्ट पद्धतीने शंकरा संगीत विद्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आले होत्या. या स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, सातारा, बारामती, अकलूज, माळशिरस, म्हसवड या ठिकाणाहून स्पर्धकांनी आपली नोंद केली होती.
या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व कलाकार हे चुरशीचे होते. शंकर वाघमारे यांचा या स्पर्धे मागचा एकच हेतू आहे की, सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुका या ठिकाणी संगीत विषयाचा प्रसार व्हावा व घरोघरात, शाळेत संगीत विषय शिकवला जावा. या हेतूमुळे सालाबदाप्रमाणे गायन स्पर्धा, डान्स स्पर्धा याचे आयोजन करण्यात येत असते. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माजी आमदार राजाभाऊ राऊत, तहसीलदार एफ.आर. शेख, नूतन नगराध्यक्षा तेजस्विनीताई कथले. मार्केट कमिटीचे सभापती विजय गरड तसेच शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर, संगीत अलंकार बाळासाहेब गरड, बाबासाहेब कापसे, डॉ. विनोद भालेराव, ऍड. अविनाश गायकवाड, संदीप अलाट अण्णासाहेब लोंढे, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे, उद्योजक महेश यादव, माजी शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे स्पर्धेसाठी लाभलेले हे प्रमुख पाहुणे होते. या सर्व पाहुण्यांचे शंकरदादा वाघमारे व त्यांच्या सौ. पत्नी वृक्षाली वाघमारे व विद्यालयाच्या सर्व टीमकडून सर्व पाहुण्यांचे संविधान ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून ज्यांचे महाराष्ट्रभर गाजलेले गीत ‘पावन जेवलाव का पाटलाचा बैलगाडा’ अशा अनेक लोकगीतांनी नावाजलेले प्रसिद्ध गायिका राधाताई खुडे यांचाही संविधान परत देऊन सन्मान करण्यात आला. या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजनन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रम दुपारी सुरु करण्यात आला. या स्पर्धेमध्ये ५५ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचा निकाल रात्री देण्यात आला व या सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहणारे उत्कृष्ट असे परीक्षण गायन स्पर्धेसाठी निहाल शेख यांनी परीक्षण केले.
तसेच साजिद बागवान यांनी डान्स स्पर्धेसाठी परीक्षण केले. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेल्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
शंकरा संगीत विद्यालयाचे सर्व टीम- निलेश वाघमारे, नागराज वाघमारे, भालचंद्र राजगुरु, राजेंद्र बेले, हमने, संदीप अलाट, राहुल बोकेफोडे, क्षितीज नेवरे, राजाभाऊ लोखंडे व सर्व विद्यार्थी यांनी सहकार्य व परिश्रम करुन या स्पर्धा पार पाडल्या. शंकरा आयडॉलमध्ये विजयी झालेल्या स्पर्धक पुढीलप्रमाणे- डान्स स्पर्धक प्रथम पारितोषिक- १) स्नेहल विधाते- सोलो लावणी व विभागून धनगरी नृत्य ग्रुप डान्स. द्वितीय- सानिका भागवत सोलो नृत्य विभागून ऐश्वर्या लोंढे सोलो नृत्य. तृतीय- दिव्या मागडे विभागून कृष्णा तुंबारे. उत्तेजनार्थ- शौर्य ढेले विभागून मानवी वाघमारे.
विजयी गायन स्पर्धेमधील- प्रथम- स्तुती राजू लोखंडे विभागून प्रणिता वाळके. द्वितीय- हर्षदा पवार विभागून प्रसाद उलांडे. तृतीय- प्रशांत वाघमारे विभागून उस्मान कोतवाल. उत्तेजनार्थ- श्रेया बोरा विभागून मयंक जेगावकर.



















