महाराष्ट्र शासनाचा अल ईम्रान प्रतिष्ठानला जिल्हा युवा पुरस्कार प्रदान
————————————————
बिलोली (तालुका प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेडच्या वतीने अल ईम्रान प्रतिष्ठान बिलोली या संस्थेला दि.१५ आॕगस्ट २०२४ रोजी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष डाॕ.मोहसीन खान यांना जिल्हा युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या युवा धोरण सन २०१२ अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानासुर जिल्ह्यातील संस्थाना समाज हिताच्या कार्याचा गौरव करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा दरवर्षी युवा पुरस्कार देण्यात येता.सन २०२१-२२ यावर्षाचा युवा पुरस्कार बिलोली येथील अल ईम्रान प्रतिष्ठान या संस्थेला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष डाॕ.मोहसीन खान यांना(गौरवपञ,सन्माचिन्ह,शाल,पुष्पगुच्छ,श्रीफळ) शासकिय ध्वजारोहण कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.या पुरस्कार वितरण सोहळ्यास व्यासपिठावर जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मिनल करनवाल,
पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार,महानगरपालिकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी महेश डोईफोडे,निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर,अप्पर जिल्हाधिकारी बोरगावकर,ना.तहसिलदार मकरंद दिवाकर,जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार ठेंभरे आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.सदरिल कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले.अल ईम्रान प्रतिष्ठानला मिळालेल्या पुरस्काराबद्दल नेहरु युवा केंद्रांच्या संचालिका चंदा रावळकर,क्रीडा अधिकारी प्रविण कोंडेकर,संजय बेतीवार,राहुल श्रीमनवार,चंद्रप्रकाश होनवडजकर,बालाजी शिरशीकर,शिवकांता देशमुख सह संतोष कणकवार,संजय चव्हाण,आनंद जोंधळे,मोहन पवार,सुभाष धोंगडे,यश कांबळे,विद्यानंद भालेराव,ज्ञानेश्वर थोटे,नगरसेवक प्रतिनिधी आजम बेग,कैलास गायकवाड,विनोद कुटे पाटील यांच्यासह पञकार,मिञ परिवार यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.