जेऊर – करमाळा जामखेड रस्त्याची आळजापूर पर्यंत अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्याने वाहने घेऊन जाणे अवघड झाले आहे. परिणामतः रोज एक अपघात घडताना दिसतो आहे. या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याकारणाने राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष अंगद देवकाते यांनी फोन लावून सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा यांना खडे बोल सुनावले व हा रस्ता महाराष्ट्रात आहे का असा प्रश्न केला कारण या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे रोज अपघात घडत आहेत. खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे नुकसान होत आहे हा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ सोडवावा व रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
प्रतिक्रिया:
” करमाळा-जामखेड रस्ता हा आळजापूर पर्यंत अत्यंत खराब झाला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन ही काम पूर्ण होत नाही.येथे रोज अपघात व वाहनांचे प्रचंड नुकसान होत आहे.साध्य आम्ही लोक सहभागातून खड्डे बुजवत आहोत.”
– अंगद देवकते, रासप तालुकाध्यक्ष, करमाळा
“पुराच्या पाण्यामुळे रस्ता खराब झालेला आहे.सदर रस्त्याची दुरवस्था मान्य आहे.मात्र आचार संहितेमुळे टेंडर निघत नव्हते. उद्या यंत्रणा पाठवून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेत आहोत.
– अभिषेक पवार
उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा.


















