सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालय येथे पार पडल्या .यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर ची विद्यार्थिनी दिव्यसाक्षी प्रकाश धोत्रे हिने
महिला कुस्तीमध्ये 50 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविले.व सलग दुसऱ्यांदा ऑल इंडिया मध्ये निवड झाली.राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
या यशाबद्दल प्राचार्य डॉ. बाळासाहेब बळवंत,उपप्राचार्य डॉ.भगवान नाईकनवरे, डॉ. गजधाने डॉ. राजेश कवडे, अधिष्ठाता डॉ. अनिल चोपडे, डॉ. उमेश साळुंखे व महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, जिमखाना विभाग सदस्य,शिक्षक कर्मचारी यांनी केले. तसेच या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अनिल परमार, प्रा.विठ्ठल फुले, आणि प्रा.मनोज खपाले यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच आईवडिलांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
ही निवड कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयासाठी खूप अभिमानाची बाब असून या खेळाडूला विद्यापीठ पातळीवर पुढील वाटचालीस उत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.