सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ लोणेरे अंतर्गत आयोजित सोलापूर झोनल फुटबॉल स्पर्धेत ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या फुटबॉल संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपविजेतेपद पटकावले. संपूर्ण स्पर्धेत संघाने आक्रमक खेळ, अचूक समन्वय आणि जिद्दीने लढत दिली.
ऑर्केड महाविद्यालय सोबत झालेल्या अंतिम सामन्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. महाविद्यालयाच्या खेळाडूंनी शेवटपर्यंत दमदार प्रतिकार करत प्रतिस्पर्ध्यांना कठीण आव्हान दिले. संघाच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्था अध्यक्ष श्री सिद्धेश्वर पाटील, सचिव श्री शिवानंद पाटील कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले, प्राचार्य, डॉ. व्ही. व्ही. पोतदार,क्रीडा विभागप्रमुख प्रा. शिवशरण कोरे, व शिक्षकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
सोलापूर झोनमध्ये महाविद्यालयाने केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून पुढील स्पर्धांमध्येही संघ अधिक चमक दाखवेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
*फोटो ओळी :- यशस्वी खेळाडू सोबत संस्था सचिव शिवानंद पाटील, प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार, डॉ. रविराज दरेकर, डॉ. सुदर्शन गडवाल, प्रा. श्रीपाद कुलकर्णी क्रीडा विभाग प्रमुख प्रा. शिवशरण कोरे*
























