मुदखेड / नांदेड – दि.३ डिसेंबर हा दिवस जागतिक अपंग दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने मुदखेड शहरातील निवासी मुकबधिर विद्यालयात दि.३ डिसेंबर रोजी दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम अपंगाचे जनक डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर मुदखेड शहरांमध्ये प्रमुख मार्गाने रॅली काढण्यात आली.
यावेळी निवासी मुकबधिर शाळेचे मुख्याध्यापक एच.एस. कवलवाड, कला शिक्षिका एस.एस.सूर्यवंशी, कलाशिक्षक बी.एस.वाघ,
विशेष शिक्षक जी.व्ही.बामणे,विशेष शिक्षक एस.आर.हजारे, कनिष्ठ लिपीक के.एल. जामुंदे,काळजीवाहक डी. जी.हासेवाड,सेवक जी.एम. शिंदे, स्वयंपाकिंन एन.एस.वाडेकर,यासह आदिंची उपस्थीती होती.






















