हदगाव / नांदेड – हदगाव तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी यांच्या भ्रष्टाचारी व हुकूमशाहीचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसत असून अनेक छोटे – मोठे कामासाठी संबंधित अधिकारी नागरिकांकडून आर्थिक मागणी करत असल्याची धक्कादायक घटना घडली असून याची दखल खुद्द हदगाव – हिमायतनगरचे आ. बाबुराव कदम कोहळीकर यांनी घेतली.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद . नांदेड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे चिंचगव्हाण ता. हदगाव येथील ग्रामविकास अधिकारी नामदेव निर्मल यांची तात्काळ चौकशी करून निलंबनासह शिस्तभंगाची कारवाईची मागणी करण्यात आली असून यामुळे भ्रष्टाचारी ग्रामविकास अधिकारी यांच्यामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
हदगाव तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी यांनी अक्षरशा कहर माजविला आहे कोणतेही काम असो अथवा विविध योजना अंतर्गत मिळणारे लाभ असो याकरिता सरळ- सरळ पैशाची मागणी होत असते अशी नेहमीच जनतेतून ओरड होत असताना याची दखल घेऊन आ. कोहळीकर यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांना निवेदनाद्वारे ग्रामविकास अधिकारी नामदेव निर्मळ हे लहान मोठ्या कामांसाठी संबंधित अधिकारी नागरिकांकडून आर्थिक मागणी करत असल्याची गंभीर स्वरूपाची माहिती मिळाली.
या सर्व प्रकरणाची सखोल व तात्काळ चौकशी करण्यात यावी चौकशीत दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनासह आवश्यक कायदेशीर व शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.






















