मुदखेड / नांदेड – मुदखेड येथील प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने दि.३ डिसेंबर रोजी दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम महामानव भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व हेलेन केलेर यांच्या प्रतिमेला वंदन करून जागतिक दिव्यांग दिनानिमित्त प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये निवासी मुकबधीर विद्यालयामध्ये प्रहार संघटनेच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि मिठाई वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास दिव्यांग बांधवांसह माजी सैनिक व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेचे मा.प्रमुख अनिल शेटे पा. यांनी मार्गदर्शन करताना दिव्यांगांसाठी सुरू असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली व सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पूर्ण मदत करू,असेही त्यांनी आश्वासन दिले.
व तसेच प्रहार संघटनेचे महिला प्रतिनिधी शंकरराव पा.शिंदे,दत्ता पा.नांद्रे, व प्रहार ता.सचिव निवडंगे यांनी दिव्यांग बांधवांना शुभेच्छा देत त्यांचा आत्मविश्वास वाढेल असे मार्गदर्शन केले.
यावेळी रामराव पा.पावडे, आनंदराव साबळे,माधव आंनसापुरे,रमेश राऊत, पाटमाशे,अशोक निखाते,
आणुसयाबाई साबळे, असलम शेख,आनंदा आठवले,मारोती बिच्छेवार, अभिजित चुंचे,विश्वनाथ हातागळे,ओमकार चव्हाणं,श्याम मुतकलवाड, शंकर मुपडे, यासह आदिंची उपस्थिती होती.























