सोलापूर – दिवाळी सणात रोषणाई सोबत जल्लोषाचे वातावरण असते ते म्हणजे फटाके उडविणे. शहरात विविध ठिकाणी फटाके विक्रीला सुरुवात झाली आहे. यावेळी जुन्या फटाकड्यासह नवीन फटाके विक्रीसाठी बाजारात आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. यावर्षीची दिवाळी धूमधडाक्यात होणार असून लहान मुलांसाठी देखील रंगीबेरंगी रंग असणारे फटाके पाहायला मिळणार आहेत. विशेषतः ग्रीन फटाक्यांची विशेष मागणी दिसून येत आहे. लहान मुलांसाठी पॉप ( लसूण) आणि बिडी बॉम्ब आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. यामुळे प्रदूषणात वाढ होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
विविध ठिकाणी असलेले फटाकेचे दुकान हे दरवर्षीप्रमाणे गच्च भरलेले दिसून येत आहेत. जमिनीवर उडणाऱ्या फटाक्यांसह आकाशात ही रंगीबेरंगी आतषबाजी यावेळी पाहायला मिळणार आहे. जमिनीवर फिरते चक्र आता आकाशात फिरताना दिसणार आहे. यावेळी फटाके हातात धरून देखील उडवता येणार आहे.
विविध नमुन्याच्या अतिशबाजी फटाक्यांची सोलापुरात होणार असे चित्र दिसत आहे. पूर्वी फुल बजा, सुतळी बॉम्ब, लक्ष्मी तोटा, भुईचक्कर, रॉकेट, टिकली फटाकडी, साप गोळी अशा फटकड्यांसह दिवाळी साजरी केली जात मात्र, आता या फटक्यांमध्ये नवनवीन व्हरायटी आली आहे. त्यामुळे दिवाळी आणखीन धूमधडाक्यात होणार असून व्यापाऱ्यांकडून तसे फटाके यावेळी बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. यंदाच्या दिवाळीमध्ये फटाक्यांचे दर तेजीत आहेत. झालेल्या अतिवृष्टीमुळे फटाके निर्मिती ठप्प झाली होती. तर काही फटाक्यांची निर्मिती करताना सर्व कच्चा माल पाण्यात भिजल्याने त्याची निर्मिती करता आली नाही. त्यामुळे दरात यंदा थोड्याफार प्रमाणावर वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. जमिनीवरील फटाक्यांची किंमत शंभर रुपयांपासून ते पाचशे रुपयापर्यंत आहे. तर आकाशात उडणाऱ्या फटाक्यांची किंमत पाच रुपये पासून दोन हजार रुपये पर्यंत असल्याचे सांगण्यात आले.
ग्रीन प्रदूषण विहिरीत फटाके
दरम्यान, बच्चे कंपनीसाठी आता प्रदूषण विरहित फटाके बाजारात दाखल झाले आहेत. पॉप ( लसूण ) बिडी बॉम असे फटाके बच्चे कंपनीचे लक्ष देऊन घेत आहेत. यामुळे कोणतीही इजा होण्याचा धोका नाही तसेच प्रदूषण होणार नाही. अशा नव्या पद्धतीचे फटाके बाजारात आल्याने आनंद द्विगुणित होत आहे. याची किंमत देखील परवडणाऱ्या दरात आहे.
हे नवीन बाजारात उलब्ध
काही वर्षांपूर्वी मोजक्याच फटाक्यांनी दिवाळी साजरी होत असे. आता मात्र आधुनिक काळनुसार फटक्यांमध्ये देखील नाव नवीन नमुने शहरात विक्रीसाठी आणले आहेत. यामध्ये विविध बंदुका, रंगीबेरंगी झाड, बिडी फटाका, हेलिकॉप्टर फटाका, फोटो फ्लॅश, रस्सी खेच (ठग ऑफ वार) रिसायकल चाकरी, कलर फुल्ल चाकरी, कलर स्मोक, टिन रंगी बेरंगी झाड, हॅण्ड शोट, मेरी गो राऊंड, पॅराशूट रॉकेट असे अनेक नमुने बाजारात विक्रीसाठी आले आहेत.