सोलापूर – क्रांती तालीम चे प्रमुख व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या कित्येक वर्षापासून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर सपाटे यांनी शुक्रवारी सायंकाळी क्रांति तालीम येथे शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये दोन्ही जिल्हाप्रमुख यांच्या हस्ते शिवसेनेचे उपरणे घालून प्रवेश केला. यावेळी पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. येणाऱ्या काळात पूर्व आणि पश्चिम एकत्र येऊन समोरच्यांना उत्तर देऊ. या धनुष्यबाणानेच समोरच्यांचा छेद करायचा असल्याचा इशारा ज्ञानेश्वर सपाटे यांनी बोलताना दिला.
एका विवाह सोहळ्यामध्ये जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आणि माझी भेट झाली होती. त्याचवेळे पासून शिवसेना पक्षात प्रवेश करण्याची चर्चा सुरू झाली. गेली दहा वर्ष झाले क्रांती तालीमने गुलाल उधळला नाही. अनेक संकटांना धाडसाने तोंड दिले. अमोल शिंदे कडून एक प्रस्ताव आला त्याला मी होकार दिला. क्रांती तालीम येथील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन, चर्चा करून हा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामांवर प्रेरित होऊन, शिवसेनेत प्रवेश केला. गुलाल आपणच उधळणार असल्याचा विश्वास ज्ञानेश्वर सपाटे यांनी व्यक्त केला.
क्रांती तालीम ते जुना विठ्ठल मंदिर पर्यंत आता आमचा हा परिसर झाला आहे. शहर उत्तर मधला बालेकिल्ला हा सात आहे. ज्ञानेश्वर सपाटे हे युवकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी नेहमी झटत असतात. ज्ञानेश्वर सपाटे हे ज्या विश्वासाने पक्षात आलेले आहेत त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही. सर्व मतभेद विसरून आम्ही एकत्र आलो आहेत. ज्ञानेश्वर सपाटेंना महापालिकेत पाठवण्यासाठी आमच्याकडून प्रामाणिक प्रयत्न केला जाईल असा शब्द जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी बोलताना दिला.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख अमर पाटील, दत्ताबुआ शिंदे, शहर प्रमुख सचिन चव्हाण, संकेत पिसे, हनुमंत बेसूळके, अनिकेत पिसे, अजय मस्के, शिवाजी भोसले, सुदामा सावंत, सागर पिसे, सुनंदा साळुंखे, मनीषा नलावडे, मनोज सरवदे, संदीप चेळेकर, संतोष जावळे, राजू निकम आदी क्रांती तालीम व थोरला मंगळवेढा तालीमचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















