बिलोली / नांदेड – एडस, एचआयव्ही बाधित व्यक्तिंशी, रुग्णांशी मानवतावादी दृष्टिकोनातून वागा, विशेष करुन एचआयव्ही बाधितांना धिर दिला पाहिजे, अश्या एडस सप्ताहनिमित्त रॕली, कार्यक्रम, जनजागृती,व प्रबोधन करण्याची आज आवश्यकता आहे. एडस बाधित व्यक्तिंशी भेदभाव करु नका असे आवाहन प्रभारी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॕ.विजयकुमार मोरे यांनी केले.
जागतिक एडस सप्ताहनिमित्त उपजिल्हा रुग्णालय व अल ईम्रान प्रतिष्ठान बिलोली यांच्या संयुक्त विद्यमाने दि.६ डिसेबर २०२५ रोजी शनिवारी दुपारी ११: ३० वाजता आयोजित कार्यक्रमात डाॕ.मोरे बोलत होते.या रॕलीसाठी उपस्थित सर्वांना अल ईम्रान प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डाॕ.मोहसीन खान यांनी एडस विरोधाची शपथ दिली. उपजिल्हा रुग्णालयापासून, गांधी चौक ते जुना बसस्टँड ते परत उपजिल्हा रुग्णालय अश्या मुख्य रस्त्याने एड्स विरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली.
या एडस जनजागृती रॕलीस उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.विजयकुमार मोरे यांच्या हस्ते हिरवा ध्वज दाखवून फेरीस सुरूवात करण्यात आली. आयटीआय काॕलेज चे विद्यार्थ्यांनी या फेरीत हातात फलक,बॅनर घेऊन सहभाग नोंदविला होता. विविध घोषवाक्यांनी रॅली दणाणून गेली.
यावेळी डाॅ.तन्जिल बेग, डाॕ.शिवकुमार सावरगावे, डाॕ.समरिन शेख, डॉ.अक्षय गायकवाड यांच्यासह अश्विनी पाटील, विद्या पवार, सरस्वती गायकवाड, वर्षा काशिदे, आयटीआय चे ईन्स्ट्रक्टर सोंनकांबळे ए.एन, हुलसुरे एस. एम, संगमवार एस वाय सह सर्व नर्स,स्टाॕफ आदिंची उपस्थिती होती.
रॅलीत एपपीडब्ल्यु नागनाथ पवार,रुपाली कंडेवाड, अश्विनी पाखरे, मिनाक्षी उराडे, दिनेश तळणे, १०२ च्या रुग्णवाहिकेचे चालक महेश हळीखेडे अदिंनी सहभाग नोंदवला.एडस रॅली यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या आयसीटीसी विभागाचे समुपदेशक देविदास भोईवार,लिंक वर्कर किनाळकर ए एच यांनी परिश्रम घेतले.शेवटी उपस्थितांचे आभार अल ईम्रान प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.मोहसीन खान यांनी मानले.
























