भोकर / नांदेड – वन्यप्राणी बिबट्या साठी वनपरिक्षेत्र कार्यालय(प्रा.)भोकर अंतर्गत येणारे भोकर उमरी धर्माबाद या सर्व ठिकाणी वनविभागाचे अधिकारी कर्मचारी यांचे मार्फत प्रतिबंधात्मक उपाय योजना व जनजाग्रती करण्यात येत आहे.या बाबत नागरीकांनी घाबरुन जावू नये तसेच वरिल तिन तालूक्यातील नागरीकांना सोशल मिडिया वापर धारकांना कळविण्यात येते की,घटनेची शहानिशा केल्याशिवाय अफवा पसरवून नागरीकांना भयभित करु नये असे आवाहन उपवनसंरक्षक केशव वाबळे,सहाय्यक वनसंरक्षक श्रिकांत इटलोड यांचे मार्गदर्शनाखाली भोकरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अंगद खटाने यांनी केले आहे.
सध्या जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी बिबट्या बाबत च्या बातम्या येत असून भोकर उमरी धर्माबाद तालूक्यातील काही गावातून सूध्दा बिबट्या बाबत बातम्या येत आहेत त्याबाबत वनविभागाचे अधिकारी,कर्मचारी हे घटनास्थळावर जावून नागरिकांना बिबट्या बाबत जनजाग्रती करुन घाबरुन न जाण्याचे आवाहन करत आहेत आपल्या परिसरात वनक्षेत्र जास्तीचे असल्याने घाबरुन न जाता पूढिल उपाय योजना कराव्यात दोन्ही हात वर करुन आरडा ओरडा करणे,बिबट्यापेक्षा मोठा प्राणी आपण असल्याचे भासविने बिबट्यापासून हळूहळू मागे सरकणे व स्वतःला सूरक्षित करणे बिबट्याला त्याच्या मार्गाने शांतपणे जावू देणे.
रात्रीच्या वेळी टाॅर्च चा वापर करणे,हातात घूंगरु असलेली काठी ठेवणे,मोबाईलवर गाणे वाजवत जाणे लहाण मूले वृध्दांना बाहेर एकटे न सोडणे पशूधन जाळीबंद बंदिस्त गोठ्यात बांधने,शेतात व घराबाहेर रात्रीस उघड्यावर न झोपणे प्रतिबंधात्मक उपाय करणे महत्वाचे आहे.
अचानक बिबट्या दिसल्यास वनविभाग कार्यालयास संपर्क साधावा याबाबत कूठलीही अफवा पसरवून नागरीकांना भयभित करु नये असे आवाहन भोकर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अंगद खटाने वनपाल ज्ञानेश्वर धोंडगे सूभाष पिल्लाजी यांचेसह वनकर्मचारी यांनी केले आहे.

























