अक्कलकोट – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व सोलापूर जिल्हा सॉफ्ट फुटबॉल, टेनिस व्हॉलीबॉल, पेंटॅक्यू व डॉजबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सब जुनियर, ज्युनियर व सीनियर राज्यस्तरीय स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांचे सुपूत्र तथा युवा नेते प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते फत्तेसिंह क्रिडांगणावर मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी उद्योगपती सचिन किरनळ्ळी, डॉजबॉलचे राज्यसचिव शिवछत्रपती पुरस्कार विजेते एकनाथ साळुंके, पेंट्याकूचे राज्य सचिव प्रदीप साखरे, टेनिस व्हॉलीबॉल राज्य सचिव गणेश माळवे, सॉफ्ट फुटबॉलचे राज्य सचिव तथा सॉफ्ट फुटबॉल खेळाचे जनक प्रा.संतोष खेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाप्रसंगी युवा नेते प्रथमेश इंगळे यांनी विजयी संघाचे व पदकप्राप्त खेळाडूंचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धांचा अंतीम निकाल खालील प्रमाणे असून यामध्ये डॉजबॉल या खेळात सब ज्युनिअर मुलांमध्ये प्रथम क्रमांक जालना, द्वितीय नाशिक, तृतीय रायगड, सब जुनिअर मुलींमध्ये प्रथम क्रमांक छत्रपती संभाजीनगर, द्वितीय रायगड शहर, तृतीय रायगड ग्रामीण, सीनियर महिलांमध्ये प्रथम क्रमांक छत्रपती संभाजी नगर, द्वितीय रायगड, तृतीय जालना, सीनियर पुरुष खेळाडूं मध्ये प्रथम क्रमांक संभाजीनगर, द्वितीय रायगड, तृतीय जालना, सॉफ्ट फुटबॉल मध्ये ज्युनियर गट मुलांमध्ये प्रथम सोलापूर शहर, द्वितीय सोलापूर ग्रामीण, तृतीय परभणी ज्युनियर मुली प्रथम सोलापूर शहर, द्वितीय सोलापूर ग्रामीण, तृतीय लातूर, पेंटॅक्यू खेळात सब जुनियर मुले सिंगल, प्रथम जळगाव, द्वितीय परभणी, डबल्स प्रथम जळगाव, द्वितीय परभणी, ट्रिपल प्रथम जळगाव द्वितीय परभणी, मिक्स डबल, प्रथम जळगाव, द्वितीय परभणी, शूटिंग मध्ये प्रथम जळगाव, द्वितीय परभणी, सीनियर पुरुष, सिंगल प्रथम ठाणे, द्वितीय लातूर, तृतीय अहिल्यानगर, डबल प्रथम ठाणे, द्वितीय लातूर, तृतीय अहिल्यानगर, ट्रिपल प्रथम लातूर, द्वितीय ठाणे, तृतीय अहिल्यानगर,
मिक्स डबल प्रथम लातूर, द्वितीय जळगाव, तृतीय अहिल्यानगर, शूटिंग प्रथम ठाणे, द्वितीय लातूर, तृतीय अहिल्यानगर, टेनिस व्हॉलीबॉल मिनी गट मुले, प्रथम सांगली ग्रामीण, द्वितीय ठाणे, तृतीय पुणे, मिनी गट मुली प्रथम सांगली शहर, द्वितीय लातूर, तृतीय बुलढाणा, मिक्स डबल प्रथम पुणे, द्वितीय ठाणे, तृतीय नाशिक, युथ मुले प्रथम पुणे,
द्वितीय नासिक, तृतीय मुंबई, सब युथ मुली प्रथम सांगली शहर, द्वितीय बीड,
तृतीय नाशिक, युथ मिक्स डबल
प्रथम पुणे द्वितीय सांगली ग्रामीण,
तृतीय मुंबई उपनगर येथील खेळाडूंनी यश मिळविले आहे. या स्पर्धा यशस्वी होणे करीता संयोजन समितीचे अध्यक्ष महेश इंगळे जिल्हा सचिव व सॉफ्ट फुटबॉल खेळाचे जनक प्रा.संतोष खेंडे, खजिनदार गंगाराम घोडके, उपाध्यक्ष वसीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली इकबाल दलाल, परमेश्वर व्हसुरे, संचालक श्रीधर गायकवाड, रवींद्र चव्हाण, प्रबुद्ध चिंचोलीकर, संतोष पाटील, प्रशांत कदम, सिताराम भांड, सागर जगझाप यांनी परिश्रम घेतले. यावेळी उपाध्यक्ष रामेश्वर कोरडे, सहसचिव मकरंद कोराळकर, सहसचिव प्रा.राकेश शिंदे, रवींद्र गुडे, विविध जिल्ह्याचे सचिव पंच प्रशिक्षक पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळ – खेळाडूंना बक्षीस वितरण करताना प्रथमेश इंगळे व इतर मान्यवर व खेळाडू दिसत आहेत.

















