इंटरनेटचा वापर वाढल्याने आजकाल बँकिंग क्षेत्रातील कामे ऑनलाईन पद्धतीने केले जातात. मात्र ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवताना नकळत आपल्याकडून बँक खाते क्रमांक चुकीचा टाईप होतो आणि पैसे चुकीच्या खात्यावर जातात. मात्र असच काही तुमच्याकडून झालं तर घाबरू नका. पुढील 48 तासांच्या आत पैसे परत मिळवता येऊ शकतात.
अशावेळी तुम्हाला पेमेंट प्लॅटफॉर्मच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करावा लागेल. जिथे तुम्हाला काही माहिती विचारली जाईल. यानंतर तुम्हाला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन तक्रार नोंदवावी लागेल. मग शक्य तितक्या लवकर तुम्हाला तुमच्या बँकेतही चुकीच्या पेमेंटची तक्रार दाखल करावी लागेल.
यूपीआय आणि नेट बँकिंगमधून चुकीच्या अकाऊंट नंबरवर पेमेंट केल्यास 18001201740 या नंबरवर तक्रार दाखल करा. यानंतर संबंधित बँकेत जाऊन फॉर्म भरून त्याची माहिती द्यावी. बँकेने मदत करण्यास नकार दिल्यास bankingombudsman.rbi.org.in या वेबसाईटवर तक्रार करावी.
मात्र रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार तक्रार केल्यास 48 तासांच्या आत पैसे परत करण्याची जबाबदारी बँकेची असते. त्यामुळे यूपीआय आणि नेट बँकिंगद्वारे पेमेंट केल्यानंतर फोनवर आलेला मेसेज डिलीट करू नका. या मेसेजमध्ये पीपीबीएल नंबर असतो जो तक्रारीच्या वेळी आवश्यक असतो.