सातारा – नॅशनल इंटिग्रॅटेड मेडिकल अससोसिएशन तर्फे घेतल्या गेलेल्या निमा रन 2025 मध्ये सहभागी झालेल्या डॉ. अंजली शिंगे ह्यांनी वयाच्या 61 व्या वर्षी 10 किलोमीटर गटामध्ये 90 मिनिटांचे रेकॉर्ड करून प्रथम क्रमांक पटकविला. त्या वर्ये येथील प्रथित यश वैद्यकीय व्यावसायिक असून सातारा तालुक्यातील वर्ये येथे त्यांचे गेली 40 वर्षे आधार हॉस्पिटल मधून त्या अविरत रुग्ण सेवा देत आहेत.

शारीरिक तंदुरुस्ती वयाच्या साठाव्या वर्षानंतरही अतिशय सुरेखपणे जोपासत मॅरेथॉनच्या धावण्याच्या ह्या माध्यमातून त्यांनी सर्व महिलांना एक आदर्श घालून दिलेला आहे. आणि फिटनेस राखण्या करिता वयाचे बंधन नसते हा संदेश त्यांनी सर्व महिला भगिनींना दिलेला आहे. सर्व स्तरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.