नवीन नांदेड – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिडकोतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क सिडको तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक वसरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सिडकोसह सिडकोतील विविध बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करून अभिवादन करण्यात आले. तर सायंकाळी ५ वाजता माता रमाई बुद्ध विहार शाहूनगर यांच्या वतीने पणती ज्योत रॅली काढण्यात आली.
सिडको येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे सकाळी १० वाजता घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून त्रिशरण पंचशील ग्रहण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी समाज बांधवासह राजकीय, सामाजिक कार्यकर्ते विलास गजभारे, राजू लांडगे, प्रदीप हानवते, डि.के. कांबळे, एकनाथ वाघमारे, डॉ. भास्कर औराळकर, मनोहर कोकरे, चंपतराव कांबळे पांडुरंग वाडे, सूर्यकांत सोनसळे, लक्ष्मण कोलते, सुनील वडगावकर, अनिल मोरे, बालाजी गायकवाड, आकाश सोनकांबळे, भगवान वाडे, उषा मोरे, सीमा कुलदीपके, माया वाडे, मस्के बाई, गौतम सोनसाळे, हर्षवर्धन झडते, सिलवान लांडगे, प्रकाश सरपाते, एकनाथ वाघमारे, रामराव सरपाते, बबन गायकवाड, हौसाजी वाघमारे, राहुल जोंधळे, यांची उपस्थिती होती. तर यावेळी लातूर फाटा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक वसरणी यांच्या वतीने या चौकात पहिलाच अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.
या ठिकाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार ओमकार चिंचोलकर यांच्या हस्ते सकाळी ११:३० वाजता पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पूज्य भानते पायाबोधी महाथेरो यांनी आपल्या भिक्षु संघाच्या उपस्थितीत उपस्थित बौद्ध उपासक – उपासिका यांना धम्मदेशना दिली.
यावेळी वसरणी येथील मोतीराम गजभारे, देवानंद सरोदे, संयजित वसरणीकर, वामन कंधारे, गौतम गजभारे, रामजी भिसे ,रघुनाथ कांबळे, भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका सुजाता आढाव, सुवास खराणे, प्रसेंजित वाघमारे, निखिल देशमुख, शामराव कांबळे यांची उपस्थिती होती. तर रमामाता बुद्ध विहार शाहूनगर यांच्या वतीने सायंकाळी ठीक ५ वाजता पणती ज्योत रॅली सिडकोच्या मुख्य रस्त्याने काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे विसर्जित करण्यात आली.
तसेच सिडको येतील जेत्वन बुद्ध विहार, पंचशील बुद्ध विहार, नागलोक बुद्ध विहार, नंदिग्राम बुद्ध विहार, नालंदा बुद्ध विहार, त्रिशरण बुद्ध विहार, प्रबुद्ध बुद्ध विहार, दीक्षा बुद्ध विहार, चंद्रमुनी बुद्ध विहार, माता रमाई बुद्ध विहार, त्रिरत्न बुद्ध विहार, श्रावस्ती बुद्ध विहार, विश्वशांती बुद्ध विहार, कुशीनारा बुद्ध विहार, सम्राट बुद्ध विहार, सुभेदार रामजी आंबेडकर बुद्ध विहार इत्यादी बुद्ध विहारात समाज बांधवांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.






















