हदगाव / नांदेड – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तालुक्यात बौद्ध अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक संस्था तसेच शासकीय कार्यालयात तालुक्यात ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज ६९ वी पुण्यतिथी साजरी केली जात आहे. समाज सुधारक, अर्थतज्ञ, विचारवंत, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री भीमराव आंबेडकर यांनी ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला होता. हा दिवस भारतात महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील संविधान प्रतिमेस विविध राजकीय व सामाजिक पुढार्यांनी अभिवादनासाठी एकच गर्दी केली होती तसेच शहरातील पंचशील शाळेचे संस्थेचे सचिव सुनील सोनुले यांनी अभिवादन केले तर शहरातील शासकीय व बौद्ध विहारात अभिवादनासाठी अनुयायांनी गर्दी केली होती.
हदगाव शहरातील तामसा रोड वर स्थित असलेले श्री साईबाबा निवासी दिव्यांग विद्यालय या ठिकाणी सुद्धा अभिवादनासाठी एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळेस प्रा. राजेश राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मोलाचे मार्गदर्शन उपस्थितांना केले.
यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक एस. बी. पाळेकर, मोरे सर, ठाकरे सर, डी.एम. डाके, बी. एस. वाघमारे, आर. एम. वट्टमवार, एस. आर. तावडे, जी. डी. धडेवार, भूषण नरवाडे, सिद्धार्थ वनंजय, टी.व्ही. मुधोळ, वाघमारे मॅडम, घाटे मॅडम, राठोड सर, रामलू सर, चंद्रकांत गुंडेवाड, येरेवाड मॅडम, गोवंदे मॅडम यांच्यासह पत्रकार बांधव व इतर मान्यवर उपस्थित होते.























