मुदखेड / नांदेड – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि.६ डिसेंबर रोजी शहरातील विविध ठिकाणी महामानवास विनम्र अभिवादन करण्यात आले.
शहरातील भिमनगर, लुंबिनी नगर, अशोका नगर, नवी आबादी, समता नगर, सिद्धार्थ नगर, शासकीय कार्यालय, शाळा, विद्यालय यासह अनेक ठिकाणी महामानवाला अभिवादन करण्यात आले. तसेच शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी बौद्ध उपासक, उपासिका, समता सैनिक दल यांच्या प्रमुख उपस्थितीत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैल चित्रास पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी बौद्ध उपासक, उपासिका, बालक, बालिका, समता सैनिक दल, सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षातील पदाधिकारी,पत्रकार बांधव, यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.या अभिवादन कार्यक्रमास मुदखेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बी.आर. कांबळे, यांच्या सह पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड कर्मचारी यांची उपस्थिती होती.शहरातील सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन महामानवाला आदरांजली अर्पण केली आणि सामाजिक ऐक्य व समतेचा संदेश दिला.


























