————————-
सोलापूर – संत शिरोमणी माऊली श्री. ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशताब्दी सुवर्ण महोत्सव समाधी दिनानिमित्त आणि स्व. ॲड. जे. ई. कुलकर्णी यांच्या ५५ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सोलापूर येथे ‘अध्यात्म आणि आरोग्य’ या महत्त्वपूर्ण विषयावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध वक्ते डॉ. जयंतराव करंदीकर हे या विषयावर मार्गदर्शन करतील. सोमवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी
सायंकाळी ६.०० वाजता, सोलापूरच्या श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. हा मार्गदर्शनपर कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुला आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन ॲड. जे. जे. कुलकर्णी परिवारातर्फे करण्यात आले आहे.



















