उमरी ( प्रतिनिधी ) नायगाव मतदार संघातील माझ्या विरोद्धात असलेल्या उमेदवाराच्या पाया खालची वाळू घसरल्याने मॅनेज झाल्याची अफवा करतात माझ्या रक्तात गदारी व मॅनेज होणे शक्य नाही मतदार जनतेनेनी अफवावर विश्वास ठेवू नये असे प्रतिक्रीया वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ माधव विभूते यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना खुलासा केला आहे .
नायगाव मतदार संघात दोन्ही उमेदवाराना जनता कंटाळली असून मी दोघाच्या पुढे निवडणूकीत विजयाच्या शर्यतीत असल्याने मला व माझ्या पक्षाला बदनाम करण्याचा विरोधकाचे षडयंत्र आहे असे ही विभूते म्हणाले .
माझ्यावर श्रध्देय बाळासोहब आंबेडकर यांनी विश्वास ठेवून उमेदवारी दिली आहे मी महात्मा बसेश्वर यांचा पाईक असून गदारी माझ्या रक्तात नाही मी मॅनेज खतगावकर उमेदवाराशी झालो हा व्हीडीओ क्लीप व्हॉटसापवर होत आहे हे चुकीचे आहे आणि खोटे आहे
जुन्ने व्हिडीओ , पत्र प्रसिद्धी करून माझ्या विरोद्धात अफवा करण्याचे षडयंत विरोद्दी पक्षाकडून होत आहे
मी एक सामान्य कुटुंबातील गरीबीची जानिव ठेवून हाल अपेष्टा सहन करून डॉक्टर झालो विरोद्दी संकट ही झेपले पण खचलो नाही वैद्यकीय सेवा करीत चांगली जनतेला सेवा दिली मला राजकीय क्षेत्रात गुतंवून दहशत दिल्यामुळे वैद्यकीय पदाचा राजनामा देवून खाजगी ” परी हॉस्पीटल उभारून” जनसेवा करण्याची संधी मिळाली आहे मी नांदेड येथिल खाजगी दवाखान्यात ५० ते ६० हजार दवाखानात डिलीव्हीरी – शिजर साठी घेतात ते मी २५ ते ३० हजारात करतो अनेक वेळा पैसे नसल्यास गरजू लोकांना ही आर्थिक मदत करून सेवा देणारा डॉक्टर आहे
जसे डॉ बाबासाहेब आंबेडकर हे समाजाची नाडी ओळखून समाजा सोबत देशाच्या उन्नतीचा भविष्य काळ घटनेत लिहला तो आज आपण उपभोगतोय तसाच प्रमाणे मी नायगाव मतदार संघाच्या निवडणूकीत तोच विचार तीच धार घेवून मैदानात उतरलो आहे मी गरीब कुटुंबातील उच्चभुषीत उच्च विचार असल्याने कोणाच राजकीय वारसा नसल्याने विरोध्क अरोप करीत आहेत
आता थोडयाच दिवसात मतदानाचे दिवस आल्याने ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे त्यामुळे विरोद्धक जनतेमध्ये मतदारामध्ये संभ्रम करून देवून दिशाभुल कराण्याचा डाव असल्यामुळे नायगाव मतदार संघातील जनतेने अफवेवर विश्वास ठेवू नये
मी निवडून येईल अथवा न येईल मी गोरठेकर घराण्याचा आदर करतो माझ्या मागे लिगांयत समाज मोठ्या प्रमाणात असल्याने दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवाराचे धाबे दणाणले आहेत
मी अल्पसंख्याक उमेदवार असल्यामुळे माझे बर्नर फाडने , गाडीवर हल्ला करणे अशी दहशत माजवत आहेत असा ही विरोध्दकावर डॉ विभूते यांनी हल्लाबोल केला आहे जनतेनी कुठल्याही अफवेवर विश्वास न ठेवता लोकसभा / विधानसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला प्रचंड मताने विजयी करावे क्रास ओटींग करू नये असे ही डॉ विभूते यांनी अव्हान केले आहे