बार्शी – आनंद युनिवर्स फाउंडेशन, पुणे यांच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार बार्शी तालुक्याचे सुपुत्र आशा केंद्राचे कार्यकारी विश्वस्त तसेच एस. एस.ॲग्रो एजन्सीचे संस्थापक डॉ. सुरेश शेळके यांना नुकताच जाहीर झाला.
आनंदी युनिवर्स फाउंडेशनच्यावतीने प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तुत्वान व्यक्तीचा सन्मान सोहळा संस्थेच्यावतीने करण्यात येते असतो. त्यात बार्शी तालुक्याचे सुपुत्र डॉ. सुरेश शेळके यांचाही समावेश आहे.
आशा केंद्राच्या माध्यमातून आरोग्य व सामाजिक क्षेत्रात विविध प्रश्नावर काम करुन काम सुरु आहे. तसेच एस. एस.ॲग्रोच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन व शेतीच्या प्रश्नावर प्रभावी कामगिरी केल्यामुळे याचा फायदा अनेक सामान्य व्यक्ती व शेतकऱ्यांना झाला. त्यामुळे डॉ. सुरेश शेळके यांच्या कार्याची दखल घेत आनंदी युनिवर्स फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश विटेकर यांनी घेतली आणि राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार याची घोषणा केली.
हा पुरस्कार प्रदान सोहळा पुणे येथे पंडित जवाहरलाल नेहरु सभागृह, घोले रोड, शिवाजीनगर येथे दि. १० डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. सुरेश शेळके यांना प्रदान करण्यात येणार आहे. असे संस्थेचे अध्यक्ष यांनी सांगितले.
 
	    	 
                                

















 
                