वैराग – भैरवनाथ माध्यमिक विद्यालय गुळपोळी मध्ये रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महासंगणकाचे जनक पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा व ग्रंथ तुला कार्यक्रम संपन्न झाला.डॉक्टर विजय भटकर यांच्या शुभहस्ते पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर स्किल स्कूलचे उद्घाटन करण्यात आले. तसेच रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान डॉक्टर विजय भटकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
बारामती इकोसिस्टीम अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड संस्थापक अभिमन्यू नागवडे यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांना वह्यावाटप व वृक्ष वाटप केले. डॉक्टर विजय भटकर यांनी प्रशालेला रौप्य महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या व प्रशालेला आदर्श स्किल स्कूल बनवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी विद्यार्थी समाधान मचाले व तुषार चिकणे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत ,सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबईचे चेअरमन डॉक्टर चंद्रकांत पाटील, डीवायएसपी, सायकर ,बार्शी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बालाजी नेटके यांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावून आपल्या मनोगतातून प्रशालेला शुभेच्छा दिल्या.
बार्शी ग्रामीण पोलीस स्टेशनचे एपीआय दिलीप ढेरे, यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक अरुण बारबोले, पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक अभिमन्यू नागवडे, सेकंडरी सोसायटी मुंबईचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, चैतन्य सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचे प्रमुख देशपांडे ,गुळपोळी गावचे सरपंच शिरीष चिकणे, शिक्षण प्रेमी गणेश चिकणे, प्रशालेचे माजी विद्यार्थी, ग्रामस्थ व मोठ्या प्रमाणात पालक वर्ग कार्यक्रमासाठी उपस्थित होता.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थापक अरुण भाऊ कापसे यांनी भूषविले.प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक प्रमोद देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन मोकाशी व देशमुख सर यांनी केले तर आभार सत्यवान माळी यांनी मानले.


















