श्रीपूर – ता . माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांची साखर आयुक्त यांच्या अपारंपारिक सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याच्या समितीवर निवड करण्यात आली आहे .
साखर कारखान्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी साखर कारखान्यांना उचित मार्गदर्शन करण्यासाठी आणि सदर योजना यशस्वीरित्या राबवण्यासाठी महाप्रीत यांचेमार्फत तयार करण्यात आलेले प्राथमिक विविधता तपासणी अहवाल आणि सविस्तर प्रकल्प अहवाल यांची छाननी करून त्यासंदर्भात साखर कारखान्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यालयाच्या स्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे.
कुलकर्णी यांच्या या निवडीमुळे सहकार व ऊर्जा क्षेत्रात कारखान्याच्या कार्याला नवी दिशा मिळणार आहे.
ऊर्जा बचत, पर्यावरणपूरक विकास आणि शाश्वत औद्योगिक धोरण यांचा प्रभावी समन्वय साधत डॉ. कुलकर्णी यांनी कारखान्याच्या कामकाजात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि दूरदृष्टीचा लाभ सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नियोजन व अंमलबजावणीसाठी होणार असल्याने ही निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
या निवडीबद्दल कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक,उमेश परिचारक, व्हा. चेअरमन कैलास खुळे, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील शेतकरी वर्गाकडून डॉ. यशवंत कुलकर्णी साहेब यांचे अभिनंदन होत असून त्यांच्या नेतृत्वाखाली सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . उत्तम कामगिरी मुळे विविध संस्थावर नियुक्ती . . . .
डॉ . यशवंत कुलकर्णी यांनी पांडुरंग कारखान्याचा कार्यभार सांभळल्या नंतर कारखान्यात योग्य व्यवस्थापनाच्या माध्यमार केलेल्या सुधारणा मुळे कारवान्याची प्रगती झाली . त्यांच्या या कामगिरीची दखल घेत साखर आयुक्तांच्या विविध समितीवर त्यांची वर्णी लागली आहे . यात महत्वाची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना मॅनेजिंग डायरेक्टर अशोसिएशन पुणे चे उपाध्यक्ष , डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी अशोलिएशन पुणे , सदस्य , महाराष्ट्र राज्य साखर कारखाना कर्मचारी आकृती बंध समिती सदस्य , महाराष्ट्र राज्य थिंक टॅन्क समिती सदस्य , महराष्ट्र राज्य एफआरपी समिती सदस्य , यांत्रीक ऊस तोडणी पाचट प्रकल्प निश्चिती समिती सदस्य या समित्यांचा सहभाग आहे .

























