सोलापूर – श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक, सोलापूर येथील प्रथम वर्ष विभागप्रमुख व इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉ. श्रीशैल मळेवाडी यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर कडून इंग्रजी या विषयात पीएच.डी. (Doctor of Philosophy) ही पदवी प्रदान केली.
डॉ. मळेवाडी यांनी “Impact of Elizabethan Drama on Sri Aurobindo’s Select Plays: An Exploration” या संशोधन विषयावर प्रबंध सादर केला. त्यांच्या या संशोधन कार्यात अरविंद घोष यांच्या नाट्यकृतींवर एलिझाबेथकालीन नाटकांचा प्रभाव या विषयाचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. इंग्रजी साहित्याच्या क्षेत्रातील हे एक मौलिक आणि संशोधनात्मक कार्य मानले जाते.
या प्रबंधाचे मार्गदर्शक म्हणून डी. बी. एफ. दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर येथील इंग्रजी विभागप्रमुख डॉ. एन. एन. लोंढे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या सहकार्यामुळे हे संशोधन यशस्वीरीत्या पूर्ण झाले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री धर्मराज काडादी, विश्वत ऍड आर एस पाटील, प्राचार्य श्री गजानन धरणे, सर्व विभागप्रमुख तसेच सर्व सहकारी प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी डॉ. मळेवाडी अभिनंदन केले. संस्थेने त्यांचा गौरव करून त्यांच्या पुढील शैक्षणिक, संशोधन आणि साहित्यिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

























