सोलापूर : नाट्यकलेच्या क्षेत्रामध्ये गेल्या पन्नास वर्षापासून मी कार्यरत आहे .मराठी आणि हिंदी अशा दहा सिनेमांमध्ये भूमिका केल्या आहेत .नटराज्याची सेवा गेल्या पन्नास वर्षापासून अखंड सुरू आहे. असे मत ज्येष्ठ नाट्य कलावंत सुशीला व्हाणसाळे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य परिषदेच्या वतीने हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी वव्हनसाळे या बोलत होत्या.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अजय दासरी हे होते.
यावेळी नाट्य परिषद सोलापूर शाखेचे अध्यक्ष माननीय प्रकाशजी यालगुलवार, नाट्य परिषद महानगर शाखेचे अध्यक्ष माननीय अजयजी दासरी ,मराठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य गुरु वठारे, परीक्षक मधुरा टापरे, दीप चहांदे, सुधीर सेवेकर, समन्वयक अमोल धाबळे आधी जण उपस्थित होते.
वेदांत करपे लिखित मनमंदिरा हे दोन अंकी नाटक सादर करण्यात आले . या नाटकाचे दिग्दर्शन संकेत कुलकर्णी यांनी केले होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पंढरपूरच्या वतीने हे नाटक सादर करण्यात आले.. या नाटकामध्ये निवृत्तीनाथाची भूमिका संकेत कुलकर्णी यांनी केली होती. तर सखुबाई, आज्ञा कवडे ,मिराबाई विनया उत्पाद, काशिनाथ नाना दत्तात्रेय जगताप, विकास वेदांत करपे, जनाई ऋतुजा लाड, ममता आरती गायकवाड, राकेश कौस्तुभ देवकर, वारकरी रेणुका बडवे ,अपूर्वा सासवडे, दिलीप कोरके ,प्रकाश योजना ,प्रतीक कसबे ,विश्वेश्वरय्या स्वामी. जाधव, नेपथ्य श्रावण डावरे
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभीज भानप यांनी केले. तर आभार समन्वयक अमोल ढाबळे यांनी मांनले


















