बार्शी – गडचिरोली येथील नाट्यश्री साहित्य कलामंच यांच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ् मय पुरस्कार डॉ. सुनील विभुते यांच्या मिरॅकल या विज्ञान कथासंग्रहास जाहीर झाला आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मान पत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार वितरण गडचिरोली येथे दि ७ डिसेंबर रोजी गडचिरोली डी.सी.सी. बँकेच्या सभागृहात प्रसिध्द रंगकर्मी पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांच्या हस्ते होणार आहे.
सुनील विभुते यांच्या यशाबद्दल प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉ. जेष्ठराज जोशी, डॉ छाया पाटील, मसाप पुण्याचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, सोलापूर मसापच्या अध्यक्षा डॉ. श्रुती वडगबाळकर, बार्शी मसापचे अध्यक्ष निपाणीकर, डॉ. निमकर, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ यादव व सर्व पदाधिकारी, श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे.डॉ. विभुते यांना यापूर्वीही विज्ञान साहित्य लेखनाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

















