बार्शी – आनंदी युनिवर्स फाऊंडेशनच्यावतीने देण्यात येणारा महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ एस. एस. ॲग्रो एजन्सीची यशस्वी वाटचाल यासाठी एस. एस. ॲग्रोचे संस्थापक डॉ. सुरेश शेळके यांना सिने कलाकार प्रसाद शिखरे, आनंदी युनिवर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश विटकर यांच्या हस्ते पुणे येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
एस.एस. ॲग्रो एजन्सीच्या माध्यमातून गावपातळीवर शेतकर्यांचे नेटवर्क तयार करुन त्यांना शेतीत उत्पादन कोणते घ्यावे, माती परीक्षण आणि पिकांवर तंत्रज्ञांनाचा वापर करुन औषधाची फावरणी कशी करावी याचे सातत्याने प्रशिक्षण शेतीच्या बांधावर जाऊन देणे. या सगळ्या कामाची दखल घेत हा पुरस्कार एस.एस. ॲग्रोच्या यशाचे शिलेदार दिनेश सुपेकर, संजय, संकेत यांच्यावतीने मी स्वीकारला. या पुरस्कार कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले ज्येष्ठ रंगकर्मी उल्हास वेदपाठक, समाज कार्य शिक्षणतज्ञ डॉ. युसुफ बेन्नुर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा पुरस्कार आम्हाला सातत्याने शेतकर्यांच्या हितासाठी काम करण्यास प्रेरणादायी राहील. शेती आणि मातीशी असलेली नात्याची नाळ अशी घट्ट होत राहो हीच भगवंत चरणी प्रार्थना, असे मनोगत व्यक्त करताना शेळके यांनी सांगितले.

























