सोलापूर : मनोरमा बँक परिवार सोलापूर, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा पश्चिम (मनोरमा), सोलापूर आणि मनोरमा साहित्य मंडळी, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहायक कुलसचिव म्हणून कार्यरत असणारे डॉ. शिवाजी शिंदे यांच्या ‘ भावगंधित व्यक्तिमत्वे ‘ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पोलीस आयुक्त एम. राजकुमार, मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा श्रीकांत मोरे, मनोरमा मल्टिस्टेट चेअरमन शोभा मोरे यांच्या हस्ते उत्साहात झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तथा चेअरमन श्रीकांतजी मोरे होते. मुख्य कार्यालय बेन्नूरनगर, आरटीओ ऑफिससमोर येथील मनोरमा सांस्कृतिक भवनातील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंग रजपूत होते. यावेळी शोभा मोरे, अस्मिता गायकवाड, अॅड. सुरेश गायकवाड, डॉ. सुमित मोरे, मनोरमा साहित्य पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. राजशेखर शिंदे, डॉ. शिवाजी शिंदे, सीमा शिंदे, फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे, उपाध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी, डॉ. मिताली मोरे, डॉ. ऋचा मोरे- पाटील, सीईओ शिल्पा कुलकर्णी, सीईओ कविता कुलकर्णी आदी उपस्थित होते.
पुस्तकाचे लेखक डॉ. शिवाजी शिंदे म्हणाले, “भावगंधित व्यक्तिमत्त्वे या पुस्तकात एकूण 29 व्यक्तींच्या जीवनकार्याचा आढावा घेण्यात आला आहे. हे पुस्तक म्हणजे व्यक्तिचित्रणात्मक लेखसंग्रह असून डॉ. राजशेखर शिंदे यांनी याचे समीक्षण केले आहे. समाजात अशी काही माणसे आहेत त्यांना उजेडात आणण्याचे काम केले आहे.
डॉ. राजशेखर शिंदे म्हणाले, या पुस्तकात समाजकारण, राजकारण, उद्योग, आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश केला असून पुस्तक अतिशय वाचनीय झाल्याचे सांगितले. यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, विजयकुमार देशपांडे, मनोज पवार, नरेंद्र गुंडेली, शोभा गवळी, प्रतिभा मोरे- गलांडे, विजयकुमार शाबादे, माधवराव गव्हाणे, ज्येष्ठ नागरिक संघाचे डॉ. विलास मोरे, डॉ. राजेंद्र मायनाळेआदी उपस्थित होते. पल्लवी पवार यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद मोरे यांनी म्हटलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


















