Wednesday, February 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पिण्याचे पाणी आणि तरुणांचे नौकरीचे प्रश्न सोडविण्याला प्रथम प्राधान्य देणार

तरुण भारतbyतरुण भारत
November 30, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर शहरातील २६ प्रभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांनी अंतर्गत रस्ते, पिण्याचे पाणी यासह गटारी, उद्योग व्यवसाय नसणे,परिणामी बेरोजगारी या प्रश्नांचा भडीमार केला आहे. त्यामुळे आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तीन दिवसातील घडामोडींचा अहवाल देणार आहोत. याशिवाय सोलापूरसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पिण्याच्या पाण्याचा तसेच तरुणांना नौकरी व बेरोजगारांना रोजगार देण्याबरोबरच महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची मागणी करणार असून पिण्याच्या पाण्याचा व तरुणांना नौकरी हे प्रश्न सोडविण्याला प्रथम प्राधान्य देणार असल्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

     सोलापूर शहरात पहिल्या दिवशी आलो, त्यावेळेस विविध भागात भेटीत देत असताना बरेचसे अनुभव आले. मात्र त्यानंतरचे दोन दिवस शहरातील एकूणच वातावरण पाहता आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत १०० टक्के अबकी बार ७५ पार झालेले दिसेल ,असेही बनसोडे यावेळी बोलताना म्हणाले.

   सोलापूर शहरात एमआयएमचे एकूण ९ नगरसेवक असून सहा नगरसेवक राष्ट्रवादी पक्षात आले आहेत. उर्वरित तीन नगरसेवकांपैकी एका नगरसेवकाच्या घरी आपण सदिच्छा भेट दिली आहे. उर्वरित दोघांशीही संपर्क सुरू आहे. सोलापूरचे चित्र निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदलताना दिसेल. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून अर्थमंत्रीसुद्धा आहेत.त्यामुळे निधी देताना ते निश्चितच राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांचा विचार करतील, असेही बनसोडे म्हणाले. सोलापूर शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच एमआयएमच्या नेते मंडळींनी सुद्धा विकास कामासाठी निधीची मागणी पत्राद्वारे आपल्याकडे केली आहे. निश्चितच अजित पवार यांच्याकडून निधी देण्याला आपण प्राधान्य देऊ,असे अण्णा बनसोडे यांनी सांगितले.

   सोलापुरात नोकऱ्या नाहीत, हाताला काम नाही,म्हणून सोलापुरातील तरुण मोठ्या प्रमाणावर पुण्यात हिंजवडीमध्ये नोकरी करत आहेत. इतक्या वर्षात सोलापूरकरांचा बेरोजगारीचा प्रश्न सुटणे महत्त्वाचे होते, परंतु त्याकडे राजकारणी मंडळींनी फारसे गांभीर्याने पाहिलेले दिसत नाही. सोलापूर हे आयटी हब होणे गरजेचे होते. कारखान्यांमध्ये सुद्धा तरुणांना नोकरी मिळणे आवश्यक होते. परंतु दुर्दैवाने ते होऊ शकलेली नाही. त्यामुळे बेरोजगारीचा मोठा प्रश्न सोलापुरात भेडसावत आहे. सोलापूर महानगरपालिकेमध्ये मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना अनेक वर्षापासून पदोन्नती दिलेली नाही. रोजंदारी कर्मचाऱ्यांचा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे. हे प्रश्न सोडविण्याला आपण प्राधान्य देणार असल्याचे अण्णा बनसोडे म्हणाले.

   सोलापूर शहरामध्ये नेमकी कोणती कामे केली पाहिजेत, कोणत्या पद्धतीने सोलापूरचा विकास झाला पाहिजे, याबाबत चर्चा झाल्यानंतरच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपणास सोलापूरचे सहसंपर्क मंत्री म्हणून नेमले आहे. सोलापूर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले तर निर्माण झालेले सर्व प्रश्न निश्चितच सुटणार आहेत,असेही ते म्हणाले. संपूर्ण राज्यातील २२ महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे. जवळपास आठ ते नऊ वर्षे निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रशासक असल्यानंतर म्हणावा तसा विकास होत नाही. त्यासाठी स्थानिक जनता किंवा नगरसेवकच असणे गरजेचे आहे. प्रभागातील अडचणी या लोकप्रतिनिधींनाच माहिती असतात, अधिकाऱ्यांना त्या माहिती असण्याचे कारणच नाही. कारण ते प्रशासकीय पातळीवर काम करत असतात.त्यामुळे लोकशाही पद्धतीने निवडणुका झाल्यानंतर निवडून येणारा लोकप्रतिनिधी आपापल्या भागाचा विकास करू शकतो,असे अण्णा बनसोडे यांनी सांगितले.

  या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान,प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, आनंद चंदनशिवे, प्रदेश चिटणीस आनंद मुस्तारे, ज्येष्ठ नेते तौफिक शेख,नूतन गायकवाड, चित्रा कदम, प्रमोद भोसले आदीसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीची सोलापूर महापालिकेत सत्ता असताना सुद्धा रोजंदारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटलेला नाहीत. पिण्याचे पाण्याचा प्रश्न जैसे तेच आहे. रोजगाराचा मोठा प्रश्न या ठिकाणी दिसून येतो. ठीकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य आहे. या प्रश्नाला म्हणावी तशी गती मिळालेली दिसत नाही.याच प्रमुख मुद्द्यावर येणारी महापालिका आपण स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

राष्ट्रवादीचे कार्यालय स्व:मालकीच्या जागेत !

 सोलापूर शहरामध्ये अजित पवार राष्ट्रवादीचे स्व : मालकीचे संपर्क कार्यालय नसल्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना अण्णा बनसोडे म्हणाले, सरकारी जागेत अजित पवार राष्ट्रवादीचे कार्यालय असण्यापेक्षा स्व:मालकीच्या जागेत राष्ट्रवादीचे कार्यालय होण्यासाठी आपण सर्वाधिक प्रयत्न करत आहोत. लवकरच सोलापुरात स्व :मालकीच्या जागेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर शहराचे कार्यालय दिसेल, असे सहसंपर्क मंत्री बनसोडे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला ठामपणे उत्तर देताना सांगितले.

फोटो ओळ – विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे प्रसार माध्यमांशी वार्तालाप करताना यावेळी शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान आदींची उपस्थिती होती.

Post Views: 24
Previous Post

सोलापुरातील व्यापारी आणि उद्योजकांच्या अडचणी सोडविणार – अण्णा बनसोडे 

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने 1 लाख दिव्यांगांना कृत्रिम अवयव वितरण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने 1 लाख दिव्यांगांना कृत्रिम अवयव वितरण

ताज्या बातम्या

ढासला येथे घरकुल घोटाळा ?सुमारे चार कोटींच्या गैरव्यवहाराचा गंभीर आरोप.#vairal

February 17, 2026

पिंपळगाव येथे सरस्वती विद्यालयाचा दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या थाटात संपन्न.#viral

February 17, 2026

स्वीकृत नगरसेवक पदी शरद मोरे, सतीश बोराडे यांची बिनविरोध निवड.#public #viral #marathinews

February 17, 2026

बसस्थानकाच्या स्लॅबवर मंजूर ऐवजी अन्य कंपनीचे सिमेंट ? निविदा अटींचा भंग झाल्याचा संशय.#public

February 17, 2026

वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.#public #marathinews #viral

February 17, 2026

पंडित दीनदयाल उपाध्याय यांना पारधयेथे पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..#public #marathinews

February 17, 2026

धनराज मोकासे रायझिंग स्टार अवॉर्ड्स ने सन्मानित.#public #marathinews #solapurnews #viral

February 17, 2026

सोलापूर जिल्हा बसव ब्रिगेडकडून गरजूंना दिलासा ना नफा ना तोटा तत्वावर रुग्णवाहिकेचे लोकार्पण.#public

February 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0684923

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697