तभा वृत्तसेवा,
सोलापूर – शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार सर्वच शाळांतील शिक्षकांना दररोज १५ ते २० मोबाइल अॅप्स वापरावे लागत आहेत. या अॅपमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी, शाळेची माहिती आणि अहवाल नोंदवताना त्यांचा  वेळ अधिक खर्च होत आहे. त्यामुळे मोबाइलबरोबर शिक्षकच हँग होत आहेत. म्हणून शिकविण्यासाठी कमी वेळ मिळत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
  वारंवार अॅप्स हँग होणे, कमी वेळेत माहिती भरण्याकरिता दबाव, यामुळे मानसिक ताण वाढला आहे. विद्यार्थ्यांवर लक्ष देण्याऐवजी तोच तोच डेटा नोंदविण्यावर भर दिला जातो, अशी खंत – शिक्षकांनी व्यक्त केली. दुसरीकडे अॅप्सचे एकत्रीकरण केले जात असल्याने मॅन्युअल काम कमी झाल्याने शिक्षकांचा वेळ वाचत आहे, असेही म्हणणे आहे.एकच माहिती दोन ते तीन वेळा अॅपमध्ये भरावी लागते. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये अंतर निर्माण होते. त्याचा परिणाम शैक्षणिक कामगिरी खालविण्यात होत आहे.
…,.
या अॅप्समुळे शिक्षक अडचणीत
….
पोर्टल, अॅप्स नाव
दीक्षा
सरळ अॅप
यू-डाइस प्लस
शाळा सिद्धी
निपुण महाराष्ट्र
प्रेरणा शाळा संवाद
महाडीबीटी
उपस्थिती
समग्र शिक्षण पोर्टल
शाळा पोषण
एमएससीईआरटी ई-बालभारती
उदय व निष्ठा प्रशिक्षण
शोमिस
शालार्थ पोर्टल
परीक्षा व्यवस्थापन प्रणाली
….
शैक्षणिक साहित्य, प्रशिक्षण व मूल्यांकन, विद्यार्थी नोंदणी, शाळा, निकाल व अहवाल, सांख्यिकीय माहिती संकलन
, स्वयंमूल्यांकन व गुणवत्ता विश्लेषण, विद्यार्थ्यांच्या मूलभूत शिक्षण प्रगती नोंदणी
,विद्यार्थी उपक्रम व पालक संवाद सुलभ , शिष्यवृत्ती व विविध शैक्षणिक लाभ योजना
, शिक्षक उपस्थिती व पडताळणी, शाळा सुधारणा, अनुदान व प्रगती अहवाल, मध्यान्ह भोजन अहवाल व विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षक प्रशिक्षण, अभ्यासक्रम व प्रमाणपत्र, शाळा व्यवस्थापन, सभांचे अहवाल व माहिती नोंद
, शिक्षकांचे वेतन, सेवा नोंदी व भत्ते, परीक्षा नियोजन, देखरेख व निकाल नोंदविणे
…..
मोबाइल अॅप्स हँग होण्याच्या सततच्या प्रकाराने शिक्षकांचा वेळ वाया जात असल्याने विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्याऐवजी कामाचा ताणच अधिक असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. मोबाईलवरील आॅनलाईन कामे करताना निर्माण होणार्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावे.
वागेश शास्त्री, मुख्याध्यापक, उध्दवराज प्रशाला, सोलापूर
..,.
शिक्षण विभागाकडून वरिष्ठ पातळीवर सर्व डिजिटल कामाचे एकत्रीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे शाळेतील सर्व माहीती आॅनलाईन करण्यासाठी पुढील कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण होईल. शिक्षकांनी आॅनलाईन कामाबरोबर अध्यापनाकडेही वेळ द्यावे.
कलप्पा हेळवी, केंद्रप्रमुख, मंद्रूप
…
शाळेत विद्यार्थ्यांना शिकविण्यापेक्षा इतर आॅनलाईन कामामुळे शिक्षकांचा अधिक वेळ वाया जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिकविण्याकडे वेळ देण्यास अवघड जात आहे. असे काम करण्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ दिले पाहिजे.
महेश केवटे, शिक्षक, सोलापूर
शिक्षक
…..
 
	    	 
                                



















 
                