मोडनिंब – दिगंबरा.. दिगंबरा..श्रीपाद वल्लभ दिगंबरा..अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्तच्या जयघोषात मोडनिंब (ता. माढा) येथे दत्त जयंतीचा सोहळा उत्साहात भक्तीमय वातावरणात पार पडला. शहरातील दत्त मंदिर, विद्यानगरी स्वामी समर्थ मंदिर, दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम, जप, यज्ञ पारायण सप्ताह साजरा करण्यात आला.

मंदिर परिसर आणि गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली.विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला. विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. गुरुवारी दत्त जयंतीनिमित्त शहरातून पालखी सोहळ्याची ग्रामप्रदक्षिणा पालखी शोभायात्रा निघाली.
श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त शहरातील मंदिरात सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे काकडा आरती झाली.सायंकाळी सहा वाजता पुष्पवृष्टी नंतर आरती झाली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप सुरू होते.

यावेळी हजारो भाविकांनी दर्शन घेत महासादाचा लाभ घेतला.

























