अकलूज – अकलूज व परिसरात श्री गुरुदेव दत्तांची जयंती भक्ती भावाने उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने प्रवचन भजन कीर्तन आधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शंकर नगर येथील शिवपार्वती मंदिरावरील दत्त मंदिरामध्ये विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीने दत्त जयंती साजरी करण्यात आली यावेळी ट्रस्टचे खजिनदार नितीन खराडे यांचे हस्ते पूजन करण्यात आले यावेळी ह.भ. प.सुळ महाराज यांचे शिष्य गण व शिवरत्न भजनी मंडळ यांनी भजनाचा कार्यक्रम केला.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले सचिव काटे साहेब व अधिकारी वर्ग कर्मचारी उपस्थित होते विजय गणेशोत्सव मंडळाचे ट्रस्टी चंद्रकांत कुंभार,भीमराव काळे, संतोष माने उपस्थितीत होते आरती नंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.

अकलूज येथील नऊ चारी बागेची वाडी येथील गुरुमाऊली साधना मंदिरामध्ये दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी डॉक्टर आसबे यांचे प्रवचन झाले तर अनंत कुलकर्णी यांचे गुरुचरित्रावरील अध्याय चौथा चे प्रवचन झाले यावेळी साधना मंदिराचे ट्रस्टी डॉक्टर श्रीनिवास जामदार व त्यांचा परिवार उपस्थितीत होता तर नंतर महाप्रसादचे वाटप करण्यात आले.
श्री साईबाबा सेवा ट्रस्ट यांच्यावतीने संग्राम नगर येथील मंदिरामध्ये दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मंदिराचे अध्यक्ष किशोर सिंह माने पाटील, अरुण राऊत, सुभाष काळे, निखिल फुले यांनी पूजन करून प्रसाद वाटप केले.
संग्राम नगर येथील श्रीपाद सेवा मंडळ यांच्या वतीने ही दत्त जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने भजन अभंग व प्रसाद वाटप कार्यक्रम करण्यात आला. अर्जुन नगर येथील सोमनाथ दरबार मंदिर येथे दत्त जयंती साजरी करण्यात येऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले या मंदिराचे विश्वस्त दीपक शेटे यांनी पूजन केले.
अकलूज मधील सर्वात जुने दत्त चौकातील दत्त मंदिर येथे मंदिराचे मुख्य विश्वस्त अशोक कुलकर्णी यांनी सप्ताह आयोजित केला होता त्यामध्ये नाम जप व दत्त महाराजांच्या विविध कथा सांगितल्या तसेच श्री अक्कलकोट स्वामी समर्थ केंद्र दिंडोरीकर महाराज यांच्या वतीनेही गुरुचरित्र पारायण आयोजित केले होते त्यामध्ये तीनशे महिलांनी सहभाग घेतला होता आज सकाळपासूनच अकलूज परिसर भक्तिमय झाला होता ठीक ठिकाणी पूजा आरती प्रसाद वाटप कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते
























