तभा फ्लॅश न्यूज/कंधार : कंधार तालुक्यातील श्री क्षेत्र उमरज येथील भूमिपुत्र सेलू (जि.परभणी) येथील उपविभागीय पोलिस अधिकारी दीपककुमार चुडामन वाघमारे यांना पोलिस दलात केलेल्या उत्कृष्ठ कार्याबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले. यानिमित्त पोलिस अधीक्षक कार्यालय परभणीच्यावतीने परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याहस्ते त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
डीपीडीसी हॉल जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे पार पडलेल्या सोहळ्यात परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे, परभणीचे पोलीस अधीक्षक परभणी रवींद्रसिंह परदेशी, माजी मंत्री खासदार फौजिया खान आदी मान्यवर उपस्थित होते.
दीपककुमार वाघमारे यांनी सुरुवातीस पोलिस उपनिरीक्षक म्हणून नागपूर शहर, नांदेड, हिंगोली, गडचिरोली, मालेगाव शहर, तर सहायक पोलीस निरीक्षक म्हणून येवला (नाशिक), जामखेड (अहमदनगर) आणि पोलिस निरीक्षक म्हणून उदगीर ग्रामीण, लातूर ग्रामीण, गंगाखेड व परभणी येथे सेवा बजावली. वरील ठिकाणी केलेल्या उत्कृष्ठ कार्याची दखल घेऊन त्यांची पदोन्नती होऊन सेलू (जि.परभणी) येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. पोलिस दलातील विविध ठिकाणी केलेल्या उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्याबद्दल त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपतीचे पदक जाहीर झाल्याने त्यांना पालकमंत्र्यांच्याहस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.