. मंठा/ प्रतिनिधी : सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे रेशन कार्डधारकांना धान्य देण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठलराव काळे यांच्या नेतृत्वाखाली ई – पॉस मशीनची प्रेतात्मक अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त केला. सर्व इ – पॉस मशीन जमा करून घ्याव्यात अशी मागणी करून नायब तहसीलदार श्री बागल यांना निवेदन दिले.
सध्या माहे जुलै महिन्याचे धान्यवाटप सुरू असून 17 जुलैपासून सर्व्हर समस्येमुळे चालत नाहीत. रेशन कार्डधारकांना धान्य देण्यास अडचणी निर्माण होत असून परिणामी दुकानदार व कार्डधारकात यांच्यात अनेक वेळा वाद उत्पन्न होत आहेत. कार्डधारकांच्या रोशाला स्वस्त धान्य दुकानदारांना सामोरे जावे लागत असून अनेक वेळा मागणी करूनही पुरवठा विभागाकडून समाधानकारक तोडगा काढण्यात आलेला नाही. सर्व्हर डाऊन च्या समस्येमुळे राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी आपल्याकडील इ – पॉस मशीन तहसील कार्यालयात जमा करण्याचा निर्णय घेतला.
त्या अनुषंगाने मंठा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी सोमवार ता.5 रोजी ई पॉस मशीनची प्रेतात्मक अंत्ययात्रा काढून नायब तहसीलदार श्री बागल यांना निवेदन दिले. या निवेदनावर संघटनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव काळे, उपाध्यक्ष शिवाजी बोराडे, कोषाध्यक्ष दादाराव हिवाळे, सचिव व्ही एन कांगणे, आर आर कुलकर्णी, सुधीर जोशी, सुरेश आष्टीकर, भगवान चौधरी, सोनाजी काळे, दत्ता दहिवाळ, सुभाष गणगे, पंढरीनाथ सस्ते, नारायण काकडे, हरिभाऊ दुबळकर, सोपान मोरे, अविनाश जाधव, सुभाष गणगे, काशिनाथ चव्हाण, आबासाहेब इंगळे, मुकुंद अंभूरे, विलास घारे, कचरू दाभाडे, नारायण राठोड, देविदास राठोड, दत्तराव चिंचने, भारत उघडे, गुलाब राठोड, सविता वायाळ, बबन राऊत, जगन सरोदे, किसन साठे, आत्माराम घुले यांच्यासह स्वस्त धान्य दुकानदारांच्या सह्या आहेत.